Skip to main content

Posts

पाऊस

रिमझिम-रिमझिम बरसे हा पाऊस, जिकडे तिकडे चोहीकडे | घरट्यात थांबून सारे पक्षी, न उडे आता नभाकडे || हिरवा शालू खूप पसरला, या ओल्याचिंब जमिनीवर | प्रसन्न होई माझे मन, जेव्हा पाऊस पडे धरतीवर || रानात मोर आनंदाने नाचतो | झाडावर कोकिळा गाणं गातो || हरीण बागडती मोकळ्या रानात | फुलांच्या गंधाने मोहित वातावरणात || तुला पाहून पावसा, अंतर्मन भारावले | नाही राहवत आता मी तुझ्यात हरवले || थेंबथेंबात स्पर्श तुझा, जीवाला मोहवतो | नकळतच हा जीव पुन्हा नव्यानं फुलवतो || ओलेचिंब भिजले आता, खूप मज्जा आली | गरमागरम चहा आणि भजी तयार झाली ||

मधेच आलेला पाऊस

उन्हात पावसाचा शिरवा आला खरा.. बघुनी मला वाटला तो बरा.. जरा जरा थेंब धरतीवर पडले.. माझे मन मात्र त्या थेंबात अडकले.. चिंब चिंब पावसाने केले ओले.. इतके की अंगावर आले शहारे.. शरीर झाले थंड मन झाले हलके.. शब्द माझे हे कवितेत झाले बोलके..

तारे

आकाशात होते आज असंख्य तारे, वाटलं हे इतके गोड का रे... "आकाश मोकळे आहे" अशी आई बोलली, बघते तर आकाशाने ताऱ्यांची जणू चादर ओढली... किती सुंदर हे इवले इवले तारे, बघून मोहित होतात सारे... जेव्हा ताऱ्यांमधून विमान जातो, तेव्हा आपण बघतच राहतो... लहानपणी वाटतं आपण तारा व्हावे, रात्रीच्या अंधकारात हलका प्रकाश द्यावे...

आई सारखं या जगात दुसरं कोणी नाही..

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे प्रसिद्ध गाजलेले वाक्य आजही जगात जिवंत आहे. "आई सारखं दैवतं या जगात नाही" हेही तितकंच. लहानपणी जे प्रेमाभावाने जपते ती म्हणजे आई... हिमालयाएवढे संकटाना सामोरे जाऊन मुलांना सांभाळते ती म्हणजे आई... आई होण्यापासून जिचं कर्तव्य मुलांकरिता मरेपर्यंत संपत नाही ती म्हणजे आई... जी दूर असूनही बाळाचं अंतरमन जाणते ती म्हणजे आई... बाळ कितीही कमजोर असलं तरी, माझं बाळ किती मजबूत आहे हा आत्मविश्वास जे जगवते ती म्हणजे आई... सत्यासाठी जेव्हा बाळ लढा देते तेव्हा, विरोधी कितीही असले तरी सत्य नेहमी जिंकत हे ठाम पणे सांगणारी ती म्हणजे आई... जगातील सगळ्यात मोठं सत्य म्हणजे आई... लाखो पैसे देऊनही जिचे संस्कार विकत घेता येत नाही ती म्हणजे आई... जिच्याकडे अमूल्य शिक्षणाचा खजिना असतो ती म्हणजे आई... जी बाळाला सांगते, अंधकारात तू प्रकाश बन, धरतीवर राहून तू तारा बन, काट्यात फुलासारखी उमल, जळूनही उजेड देणाऱ्या सूर्यासारखी बन, रडणाऱ्याच हसू बन, सत्याचा ध्वज बन, तू एक अशी मशाल बन.... तू एक अशी मशाल बन.....

एक मैत्री अशीही..

आयुष्यात वेगवेगळे लोकं आपल्याला मिळत असतात. काहींशी फार काळ असून पण मैत्री होत नाही आणि काहींशी क्षणात मैत्री होते. अशीच आम्हा सर्वांसोबत क्षणात मैत्री करून घेणारे ते विनीत. खरंतर कोणीतरी त्यांना दाद द्यावी असं त्यांचं व्यक्तित्व. सध्या कामासाठी पण, आमचं कौतुक करणारे... राग आला तरी चेहऱ्यावरून नं वाटणारे... विनीत स्पेक्ट म्हणताच चस्मा घालणारे... विविध गोष्टीं मध्ये रुची दाखवणारे... न सांगता आमच्याकरिता खाऊ मागवणारे... टीममध्ये मधेच येऊन जोक करणारे... नेहमी हसत खेळत राहणारे... प्रोडक्ट मॅनेजर कमी आणि आमचे मित्र जास्त वाटणारे... असेच हे विनीत आम्हा सगळ्यांना आवडणारे.. आज जाताना सगळे नाराज झाले, पण शेवटी सगळे चेहऱ्यावर हसू दाखवून घरी निघाले.. खरंचं, आयुष्यात चांगल्या मित्रांची खूप आठवण येते... सगळं विसरून आयुष्य पुन्हा समोर जाते...

मैत्री गाडीशी

एक होती गाडी, तीच नाव कार.. होती काळी काळी पण दिसायला फार छान... एकटी पार्किंग मध्ये बसली वाट पाहत.. काय जोरात धावलो राव, जणू चाललो आम्ही वाहत... गाडी पाशी पोहोचताच दरवाजे उघडले.. क्षणभर ही वाट न पाहता सगळे आत बसले... रोडावर येताच ती जोरात धावायला लागली... कोसळत्या पावसामुळे ती आणखी नवीन झाली.. अदवेत ला सोडून ती हळू पुढे निघाली.. छत्रपती येताच ती बाय बाय पण म्हणाली.. मला मज्जा आली कारण आता नवी मैत्री झाली.. किती ऐकणार अजून.. आता संपली कहाणी....

शोधला तर देव पण भेटतो

"शोधला तर देव पण भेटतो" हे वाक्य आपल्या रोजच्या जीवनात कित्येकदा ऐकतो. शब्दशः अर्थ पकडला तर खरंच देव भेटतो! हे डोक्यात येताच ती अजूनही खुलून हसते. गोष्ट अशी, कि तिच्याकडे एक समस्या होती. तिने समस्येचं समाधान शोधायला सुरुवात केली. समस्येच निवारण करण्याकरिता तिला वेगवेगळे मार्ग मिळाले, पण तरी समस्या काही उलगडे ना. तिच्याकडे आशा होती पण ती थकली. तिला वाटलं, "शोधून शोधून किती शोधणार?" आता थांबायला हवंय. आणि तेव्हा मागून कोणीतरी आले आणि तिला म्हणाले , "ढुंडनेसे तो भगवान भी मिल जाते है|". हे एकताच, तिच्यातले पंचतत्व वेगाने काम करू लागले. तिने असा मार्ग शोधला कि समस्येचं पूर्णपणे निवाकरण झालंय. आता ती खुलून म्हणते, "तो क्या हुआ, ढुंडनेसे तो भगवान भी मिल जाते है|".

तिची जबाबदारी

आई हे देवाने आपल्याला दिलेलं सुंदर वरदान आहे कि काय! असं मला नेहमी वाटतं असतं. ती आपल्या संसाराला तर सांभाळते पण इतरांची काळजी ही तितकीच घेते. खरं सांगायचं म्हणजे मुक्या जनावरांवर असलेलं तीचं प्रेम इतकं निर्मळ आहे, कि कधी मलाही हेवा वाटतो. त्यांची काळजी घेणे जणू काही तिची जबाबदारी. या तापलेल्या उन्हाच्या दिवसात जिथे माणूस पाण्यासाठी व्याकुळ होतो, तिथे भर उन्हात अन्न पाण्याच्या शोधात मुके जनावर तर होणारच. किती तहानलेले असतील ते, हा विचार करून ती रोज आठवणीने कुत्रे, मांजर, पक्षी आणि गाई यांच्याकरिता पाणी ठेवते. चुकून कधी पाणी ठेवायचं विसरली तर "तुम्हाला नाही आलं का ठेवता?" असं ती रागावते, पण त्यात तीच आतून दडलेलं खरं प्रेम- काळजी सहज उभारून दिसते. दिवासेंदिवस आपण मोठं होतो, आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे कदाचित छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाचे असतात याच भान विसरतो. या वेगवान वाढणाऱ्या शहरांत जागोजागी सिमेंटचे रस्ते बांधताना दिसतात त्यामुळे नंदी,नाले, तलाव, पाण्याचे डबकं फार कमी आढळतात. पाण्याचं स्रोत त्यांच्यासाठी कमी झालंय. हा विचार करून, थोडी आईची ही जबाबदारी आता मी ...

आनंदी

आई ही अशी दैवत आहे जी आपल्या मुलांना खूप जपते, त्यांना घडवते, कुठल्याही परिस्थितीत आपण कसं आनंदी राहू हे शिकवते. त्यादिवशी मी नाराज होते तेव्हा आईने मला एक साधी गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी, एक मुलगा फुगा घेण्यासाठी त्याच्या आईकडे हट्ट धरतो, कारण त्याला त्या फुग्यासोबत मनसोक्त खेळायचं होते. हट्ट बघून आई त्याला फुगा घेऊन देते. मग तो मैदानावर सतत त्या फुग्या सोबत इकडून तिकडे, कितीतरी वेळ, अतिशय आनंदाने खेळत राहतो. मुलाचा आनंद बघून तिच्याही चेहऱ्यावर हास्य खुलते. पण अचानक तो फुगा त्याच्या हातून सुटून आकाशाच्या दिशेने उडायला लागतो. तेव्हा त्याच्या आईला वाटते आता हा पुन्हा हट्ट धरणार. पण तो फुगा उडत दिसताना आणखी आनंदी होतो, खळखळून हसायला लागतो. बस एवढीच ही गोष्ट, असं सांगून माझ्या आईने मला प्रश्न केला, सांग बर तुला यातून काय शिकायला मिळालं. यावर आईला मी म्हटलं, आई हे बघ, आता मला काहीही सुचत नाही आहे. तूच सांग बघू. आईने सांगितलं, "आपण गोष्टीतल्या छोट्या मुलासारखं असावं, त्याच्याकडे त्याच्या आवडीचा फुगा होता म्हणून तो फार आनंदी होता. आणि जेव्हा त्याचा हातून तो फुगा निघून गेला, तेव्ह...

ओलेचिंब

मंद वारा होता आणि पावलं चालत होती. काळ्या ढगांच्या अंधकारात सृष्टीत काळोख पसरलेला होता. डोळ्यांनी रस्ता पाहण्याचा प्रयन्त केला पण तो ही नाहीसा झालेला दिसला. आकाशात वीजा कडकड आवाज करत जोरात चमकायला लागल्या. विजेच्या प्रकाशाने कळलं कि समोर रस्ताच रस्ता होता आणि कडेला गर्द हिरावी झाडें. वारा दिशा बदलत इकडून तिकडे धावत होता. पाखरं घरट्यात परतत होती. अचानक पावसाला सुरुवात झाली. माझा पावलांनी लगेच वळण घेतलं आणि झाडाखाली येऊन थांबली. पावसाचा वेग वाढत गेला. आपण भिजतोय म्हणून स्वतःला पावसापासून थांबावंण्याचा प्रयत्न केला पण शेवटी चिंब चिंब या पावसात भिजले.

सोनेरी चंद्र

आज आईसोबत फिरताना सहज आकाशातील चंद्राकडे नजर गेली. चंद्र हलका सोनेरी रंगाने रंगलेला होता. आईला म्हटलं, "आई बघ ती सोनेरी चंद्रकोर". आईला पण आश्चर्य वाटलं, आज चंद्राची कोर का बर सोनेरी दिसत आहे? एरवी पांढराशुभ्र दिसणारा हा चंद्र आज सोनेरी कसा काय? कधी नं वाटणाऱ्या गोष्टी पण सत्य असतात आणि आश्चर्य देऊन जातात. गप्पांमध्ये आई ने एक प्रश्न केला, "नेहा सांग बघू आपल्याला चंद्राकडून काय शिकवण मिळते?" मी विचार केला आणि म्हटलं, "माणसाने ना चंद्रासारखं शीतल असावं". आई त्यावर म्हणाली, "नाही नाही आणखी आहे बर का". मी म्हणाली, "बर आई तूच सांग कि आता, मला नाही माहिती काय ते". आईने सांगायला सुरुवात केली, "हे बघ नेहा, चंद्र जरी पांढराशुभ्र दिसत असला पण सत्यात तर त्यावरती काळे डाग आहेत. म्हणजे पूर्णरूपाने तो पांढराशुभ्र नाहीच तरीही रात्रीच्या अंधारात प्रकाश देण्याचं काम तो करत असतो. तसंच माणसांचंपण असतं, माणसांजवळ सर्वच सद्गुण असणार असं शक्य नाही काही दुर्गुणही असू शकतात, पण तो आपल्यातील सदगुणांचा उपयोग जीवन प्रकाशमय करण्यासाठी नक्कीच करू शकतो....

सभ्यता

मार्केटिंग टीम चा हेड म्हणजे आमचा स्वप्नील दादा. कामात असला कि व्यस्त इतका होतो आणि कामे पटकन होण्याच्या नादात त्याचं वेगाने इकडे तिकडे जाणं सुरूच असतं. त्यादिवशी असाच वेगाने चालत मीटिंगला गेला, पण जाताना त्याचा पाय माझा खाली ठेवलेल्या बॅगला लागला. इतक्या घाईत असताना सुद्धा, त्याने झुकून, माझ्या बॅगला हाताने नमस्कार केला. आणि नंतर मिटींगला जाण्याकरिता निघाला. हे बघून, माझ्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण झाले कारण स्वप्नील दादातील सभ्यता त्यादिवशी सहज निखरून बाहेर आली. माणूस कितीही मोठ्या झाला तरी सभ्यता आणि संस्कार त्याला आणखी मोठे बनवतात.

क्षणभरासाठी येणं

चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा स्वभावाच्या सुंदरतेला जास्त महत्व असतं. चेहरा हा बाह्यरूपी सुंदरता दर्शवतो पण स्वभावाच्या सुंदरतेने नाती मैत्री सगळं टिकून राहातं. आणि ज्यांच्या कडे दोन्ही आहे मग तर सुंदरतेलाही प्रश्न पडेल. यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे आमची शालू. तिच्या गोड स्वभावानी आम्हा सर्वांची ती लाडकी झाली. तिच्याकडे कधीही आशेने गेलं कि खाली हात कधीच परत येत नसतं. नेहमी तिच्याकडे चॉकलेट तयार असतातच. ती कधी नाकारतंही नाही. आणि संपलं तरीही आमच्याकरिता वेळात वेळ काढून आणून ठेवते. आम्ही कितीही व्यस्त असलो पण ती व्यस्त असतानाही वेळ काढून रोज आमच्या भेटीला येते. थोडया वेळ गप्पा करते, छान करमणूक करते आणि मग जाते. शालूला किती धन्यवाद करावं तेच कळत नाही कारण तिच्यामुळे आमच्यातील चिंतेत असणारे काहीजण काहीक्षणासाठी का होईना पण हसतात तर.

असा माझा दादा...

कधी कधी मला वाटतं कि मलाही मोठा दादा असायला हवा होता. जो मला नेहमी मार्गदर्शन करेल. आता तर देवाने खूप सारे मार्गदर्शन करणारे दादांशी ओळख करून दिली. त्यात माझा अमोल दादा पण एक आहे. जो मला नेहमी मार्गदर्शन करतो. हक्काने माझ्याकडे असलेले वस्तू मागतो. दादांचे नेहमीचे वाक्य "नेहा आज सोपं आणली का, दे बर पटकन", "चल इकडे बस बर नेहा, तिकडे नको जाऊ", "चल ये बर पटकन, सांग बर यात तू काय केल आहे", "टेन्शन नाही घ्यायचं नेहा, हे घे भात संपवं पटकन" आणि नेहमी मध्ये एखाद-दोन वाक्य बोलून, त्यांच दुसऱ्याला हसवण सुरु असतं. दादांचं प्रसिद्ध वाक्य "अशी गोष्ट आहे नेहा आणि तुला वाटते मजाक". आणि मार्गदर्शन करताना हे त्यांचं नेहमीच वाक्य "कुठल्याही परिस्थितीत माणसाने सहज असावं". शेवटी एवढच, दादाची जितकी प्रशंसा केली तितकी कमीच!

सुंदर हास्य

आम्ही ऑफिस मध्ये होतो, पण खरी भेट झाली ती त्या दिवशी, ज्यावेळेला स्वप्नील दा म्हणाला, "ही एकटीच आहे, इच्याशी बोलशील". दिवस तो शनिवारचा. मग स्वप्नील गेल्यानंतर आमच्या कामासोबत गप्पा सुरु झाल्या. गप्पामध्ये कधी आमची मैत्री झाली कळालं सुद्धा नाही. ती माझी मैत्रीण साधी सरळ असलेली अपूर्वा. आता नेहमी बोलणं सुरूच असतं. ती कधी हसत बाय करते तर कधी अलगद जवळ येऊन "झालं तुझं जेवण?"विचारते. कौतुकास्पद म्हणजे बोलताना तीचं सुंदर हास्य चेहऱ्यावरती कायम असतें.

हो ना अशीच ती...

नेहमी तर आनंदी असतें पण कधी कधी कामात इतकी व्यस्त होते कि खाण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. मग शांततेत काम करनं सुरुच असतें. या कामात कधी हसणं पण विसरून जाते. अशा वेळेला महान लोकांच्या छान छान गोष्टी लक्षात असतात, पण सत्यात क्वचित उपयोग होत असतील. मग काय अशाही वेळेला दिवसाला सोनेरी करणारी मैत्री जर जवळ असली कि प्रत्येक क्षण चांदी चांदी झाल्यासारखा वाटतो. अशी एक मैत्री माझ्याजवळ ही आहे. सुरवातीला जेव्हा ती मिळाली. वाटलं कशी असेल यार ही, आपल्या सोबत होईल ना मैत्री. मग हळू हळू जेव्हा तिच्या सोबत राहायला लागले तेव्हा कळालं माझा अपेक्षेपेक्षा जास्त छान आहे. नाश्ता आला कि आधी खाऊन संपवायचा असं ती बजावून सांगते. उपास असला कि दोन फळांची बॉक्स, माझा टेबलवरती ठेवलेले मी पाहिते. आणखी एक कोणाचा विचारलं तर पोट भरल्याचा बहाणा करते. मी चिंतेत असली कि, मजेदार गोष्टी सांगून, मन आनंदी करते. शांत असली कि जोक सांगून मस्तीत बदलवते. आणि ही सगळी काळजी घेणारी माझी ती मैत्रीण मोहिनी. जणू काही कामासोबत तीच दुसरं ध्येय माझी काळजी घेणं कि काय! अशी मैत्री सगळ्याकडे असो ज्यात पारदर्शी आपुलकी राहील आणि योग्य वेळेला काळ...

एका फॉरेनर ची गोस्ट

शीतल आणि मी भाजा केव वरून खाली उतरताना, एक फॉरेनर पण खाली उतरत होती. थोड्यावेळाने आम्ही पायऱ्यांवरती बसलो आणि समोर बघते तर काय? ती फॉरेनर एका कुत्र्याचा फार लाड करत होती. तिने त्याला आवडीने बिस्कीट खाऊ घातले. तीचं भारतीय कुत्र्या वरीली प्रेम बघून आम्ही मात्र हसलो. खरंच वाटलं कि आपणही, नेहमी शक्य नाही तर, कधी कधी, प्राण्यावरती दया दाखवावी शेवटी तेही आपल्या निसर्गाचा एक घटकच कि!

कॉर्पोरेट ची मैत्री

कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... कधी तिखट तर, कधी गोड असतें, कधी थोडी, तर कधी पोट दुखेपर्यंत हसवते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... नाही ऐकलं तर कोणी रागे भरते, कोणी रुसलं तर त्यालाही मनवते, "आता नाही हा बिझी आहोत" म्हणून सांगायचं थांबते, आणि कोणी बिझी असलं, तर "काम तो चलता रहेगा मेरे दोस्त थोडे मजे भी करले" असं ही म्हणते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... कामासोबत अनलिमिटेड जोक्स सूरू असतें, व्यलिड प्रश्न सोडून, इनव्यलिड प्रश्नाची भरभराट होते, कोणाचा राग आला असता कंप्लेंट दुसऱ्याला करते, शांत झालं असता प्रेमही तितकं करते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... जोरदार भूक लागली असता चला जेवायला जाऊया असं म्हणते, कोणी कॉलवर असता, दहापंधरा मिनिट सोडून अर्धा तासही थांबते, बडे असला कि केक तर ऑडर करते, पण पार्टीच्या नावाखाली खूप परेशान करते, होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें... बॉटल मधलं पाणी संपलं असता, दुसऱ्याची बॉटल संपवन्यात पटाईत असतें, आईने खाऊ दिले असता, दुसऱ्याला वाटून समजूतदारपणाही दाखवते, लाईव्...

काकांचा समजदारपणा

त्या दिवशी सर्वांकारिता गुलाबजामून नेले. सर्वांना वाटल्यानंतर शेवटचा एक गुलाबजामून ठेवला तो संजू काकांकरिता. मी गुलाबजामूनचा डबा तिथेच ठेवला जिथे संजू काका नेहमी बसतात. आणि संजू काकांना सांगितलं कि, "काका तुमच्या करिता मी एक गुलाबजामून ठेवलेलं आहे ". त्यावर संजू काका हसत म्हणाले, "हो". कामात व्यस्त असल्याने मी लगेच तो डबा नाही आणू शकले आणि विचार केला, कि जाताना हा डबा मी सोबत घरी नेईल. काम पूर्ण झाल्यानंतर मी माझा डबा परत आणायला गेले. नक्कीच खाल्लं कि नाही हे बघण्यासाठी, मी जेव्हा डबा उघडला तेव्हा बघते तर काय, डबा चकाचक धुऊन तयार. खरंतर संजू काका गुलाबजामून खाऊन डबा तसेच ठेऊ शकत होते पण त्यांनी स्वच्छ करून ठेवला, हे बघून माझा आनंदाला पारावार नव्हता.

रागावून कि प्रेमाने

आज ती पुन्हा एकदा आपल्या आई समोर व्यक्त झाली, आणि आईला म्हणाली, " आई आज माझे सर माझ्यावरती रागावले. आज त्यांनी केलेल्या कॉमेंट मुळे असं वाटलं कि, ते माझा आदर आणि सन्मान कमी लेखत आहेत. म्हणूनच मी पण सरांवरती रागावले आणि त्यांना बोलले पण. ज्या सरांबद्दल आधी माझ्या मनात फार आदर होता तो आता नाही आहे. मला बिलकुल नाही आवडतं ते सर. ". यावर तिची आई हसली आणि तिला म्हणाली, "खरंतर सरांनी अशी विचित्र कॉमेंट केली असणार म्हणून तू रागावली ना. पण ती कॉमेंट तुझा सुधारणेसाठी होती हे विसरता कामा नये कारण समोरच्यांची परिस्थिती आणि दृष्टिकोन हे आपल्याला माहित नसतं. मी मान्य करते, जेव्हा मान आणि सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा बोलणं चांगलं असतं. हे तू छान केलंस. पण शेवटी मी तुझी आई आहे आणि मला एक ठाऊक आहे, तेही तू फार रागावून बोलली असणार, ही चूक मात्र तू केली. ". ती म्हणाली, "तर मी करू तरी काय, तूच सांग ना?". आई म्हणाली, "अगं बाळा, जे तू रागावून बोललीस, ते तुला सहज प्रेमानेही सांगता आलं असतं. जेव्हा आपल्या सन्मानतेचा, आदराचा प्रश्न येतो त्यावेळेला टोचून बोलण्यापेक्षा,...