मंद वारा होता आणि पावलं चालत होती. काळ्या ढगांच्या अंधकारात सृष्टीत काळोख पसरलेला होता. डोळ्यांनी रस्ता पाहण्याचा प्रयन्त केला पण तो ही नाहीसा झालेला दिसला. आकाशात वीजा कडकड आवाज करत जोरात चमकायला लागल्या. विजेच्या प्रकाशाने कळलं कि समोर रस्ताच रस्ता होता आणि कडेला गर्द हिरावी झाडें.
वारा दिशा बदलत इकडून तिकडे धावत होता. पाखरं घरट्यात परतत होती. अचानक पावसाला सुरुवात झाली. माझा पावलांनी लगेच वळण घेतलं आणि झाडाखाली येऊन थांबली. पावसाचा वेग वाढत गेला. आपण भिजतोय म्हणून स्वतःला पावसापासून थांबावंण्याचा प्रयत्न केला पण शेवटी चिंब चिंब या पावसात भिजले.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment