Skip to main content

पाऊस

रिमझिम-रिमझिम बरसे हा पाऊस, जिकडे तिकडे चोहीकडे |
घरट्यात थांबून सारे पक्षी, न उडे आता नभाकडे ||

हिरवा शालू खूप पसरला, या ओल्याचिंब जमिनीवर |
प्रसन्न होई माझे मन, जेव्हा पाऊस पडे धरतीवर ||

रानात मोर आनंदाने नाचतो |
झाडावर कोकिळा गाणं गातो ||

हरीण बागडती मोकळ्या रानात |
फुलांच्या गंधाने मोहित वातावरणात ||

तुला पाहून पावसा, अंतर्मन भारावले |
नाही राहवत आता मी तुझ्यात हरवले ||

थेंबथेंबात स्पर्श तुझा, जीवाला मोहवतो |
नकळतच हा जीव पुन्हा नव्यानं फुलवतो ||

ओलेचिंब भिजले आता, खूप मज्जा आली |
गरमागरम चहा आणि भजी तयार झाली ||

Comments