चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा स्वभावाच्या सुंदरतेला जास्त महत्व असतं. चेहरा हा बाह्यरूपी सुंदरता दर्शवतो पण स्वभावाच्या सुंदरतेने नाती मैत्री सगळं टिकून राहातं. आणि ज्यांच्या कडे दोन्ही आहे मग तर सुंदरतेलाही प्रश्न पडेल. यातील एक व्यक्तिमत्व म्हणजे आमची शालू. तिच्या गोड स्वभावानी आम्हा सर्वांची ती लाडकी झाली. तिच्याकडे कधीही आशेने गेलं कि खाली हात कधीच परत येत नसतं. नेहमी तिच्याकडे चॉकलेट तयार असतातच. ती कधी नाकारतंही नाही. आणि संपलं तरीही आमच्याकरिता वेळात वेळ काढून आणून ठेवते. आम्ही कितीही व्यस्त असलो पण ती व्यस्त असतानाही वेळ काढून रोज आमच्या भेटीला येते.
थोडया वेळ गप्पा करते, छान करमणूक करते आणि मग जाते. शालूला किती धन्यवाद करावं तेच कळत नाही कारण तिच्यामुळे आमच्यातील चिंतेत असणारे काहीजण काहीक्षणासाठी का होईना पण हसतात तर.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Tysm for your sweet words neha 💋♥️🙏🏻
ReplyDelete