मार्केटिंग टीम चा हेड म्हणजे आमचा स्वप्नील दादा.
कामात असला कि व्यस्त इतका होतो आणि कामे पटकन होण्याच्या नादात त्याचं वेगाने इकडे तिकडे जाणं सुरूच असतं. त्यादिवशी असाच वेगाने चालत मीटिंगला गेला, पण जाताना त्याचा पाय माझा खाली ठेवलेल्या बॅगला लागला.
इतक्या घाईत असताना सुद्धा, त्याने झुकून, माझ्या बॅगला हाताने नमस्कार केला. आणि नंतर मिटींगला जाण्याकरिता निघाला.
हे बघून, माझ्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निर्माण झाले कारण स्वप्नील दादातील सभ्यता त्यादिवशी सहज निखरून बाहेर आली.
माणूस कितीही मोठ्या झाला तरी सभ्यता आणि संस्कार त्याला आणखी मोठे बनवतात.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment