Skip to main content

कॉर्पोरेट ची मैत्री

कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

कधी तिखट तर, कधी गोड असतें,
कधी थोडी, तर कधी पोट दुखेपर्यंत हसवते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

नाही ऐकलं तर कोणी रागे भरते,
कोणी रुसलं तर त्यालाही मनवते,
"आता नाही हा बिझी आहोत" म्हणून सांगायचं थांबते,
आणि कोणी बिझी असलं, तर "काम तो चलता रहेगा मेरे दोस्त थोडे मजे भी करले" असं ही म्हणते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

कामासोबत अनलिमिटेड जोक्स सूरू असतें,
व्यलिड प्रश्न सोडून, इनव्यलिड प्रश्नाची भरभराट होते,
कोणाचा राग आला असता कंप्लेंट दुसऱ्याला करते,
शांत झालं असता प्रेमही तितकं करते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

जोरदार भूक लागली असता चला जेवायला जाऊया असं म्हणते,
कोणी कॉलवर असता, दहापंधरा मिनिट सोडून अर्धा तासही थांबते,
बडे असला कि केक तर ऑडर करते,
पण पार्टीच्या नावाखाली खूप परेशान करते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

बॉटल मधलं पाणी संपलं असता, दुसऱ्याची बॉटल संपवन्यात पटाईत असतें,
आईने खाऊ दिले असता, दुसऱ्याला वाटून समजूतदारपणाही दाखवते,
लाईव्ह बग आले असता, टेन्शन मध्ये येऊन सिरिअस मोड ऑन होते,
एरवी मात्र, एकमेकांच्या वाटी जाऊन, मस्ती आपली सुरूच असतें,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

वेळ झाली कि जबरदस्ती काम ठेवायला लावते,
अडकले कोणी तर मदतही तितकीच करते,
हिरोची एन्ट्री झाली कि तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते,
मग काय चिडवनाच्या नादात अपकमिंग टेक्ट थांबतच नसते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

दुःख नि आनंद दोन्ही सोबत असतें,
जेव्हा आपल्यातून कोणीतरी जाते,
अधून मधून आठवण फार येते पण शेवटी त्यांनी शिकवलेल्या गोष्टींच अनुकरण करून या मैत्री ला अर्थ येते,
होना, कॉर्पोरेटची मैत्री थोडी अशीच असतें...

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...