शीतल आणि मी भाजा केव वरून खाली उतरताना, एक फॉरेनर पण खाली उतरत होती.
थोड्यावेळाने आम्ही पायऱ्यांवरती बसलो आणि समोर बघते तर काय? ती फॉरेनर एका कुत्र्याचा फार लाड करत होती. तिने त्याला आवडीने बिस्कीट खाऊ घातले. तीचं भारतीय कुत्र्या वरीली प्रेम बघून आम्ही मात्र हसलो. खरंच वाटलं कि आपणही, नेहमी शक्य नाही तर, कधी कधी, प्राण्यावरती दया दाखवावी शेवटी तेही आपल्या निसर्गाचा एक घटकच कि!
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment