Skip to main content

तारे

आकाशात होते आज असंख्य तारे,
वाटलं हे इतके गोड का रे...

"आकाश मोकळे आहे" अशी आई बोलली,
बघते तर आकाशाने ताऱ्यांची जणू चादर ओढली...

किती सुंदर हे इवले इवले तारे,
बघून मोहित होतात सारे...

जेव्हा ताऱ्यांमधून विमान जातो,
तेव्हा आपण बघतच राहतो...

लहानपणी वाटतं आपण तारा व्हावे,
रात्रीच्या अंधकारात हलका प्रकाश द्यावे...

Comments