"हे शितल कशी आहेस?" असल्या प्रेमाने हाक मारणारे आम्ही नाही आहोत. "तर आज आम्ही दोघी जोरात नेहमी प्रमाणे हाक मारू ..हे..शिते कुठ हाय ?....चल लवकर तयारी कर ...किती वेळ लावते...बापा रे बापा....जास्त लिपिस्टिक नको लावू.... कोणी मागं लागन न.. हे बघ मी तयार होऊन आली....नेहा पण अली ...व्यवस्तीत झाले केस चल आता...किती वेळ लावशील लई मस्त दिसून राहिली...चल आता.... हे तिन्ही चार्जर एकत्र टाक... ते लॅपटॉप उचल...कोमलच्या बॅग मध्ये टाक...हे घे बॉटल पकड...झालं सगळं...आपण पहिले एम बी ए डिपार्टमेंट मध्ये जावू... नंतर HOD ला भेटू...हे कोमडी खाली उतर लवकर...ये कोमल...नेहा शीतल आपण पहिले टाईम टेबल बनवू ..हे बघ तू bussiness card बनव... तू माहिती काढ...मी ग्राफ वर काम करते....कोमल रुम मध्ये आहे का कोणी...पटापट करा मुलींनो...नाहीतर ज्योती मानसी येईल आता....."
अहो , इतक्या साऱ्या गोष्टी अधून मधून का होईना पण तिघींचा गोंधळ.. तिघींमिळून जगलेले क्षण किती आगळे वेगळे विचित्र, आनंदाचे होते .
आज एकीचाच आनंदाचा दिवस नाहीतर तिघींचा आहे...
बाहेर अंधारात आकाश सुध्दा तारांसह झगमगत आहे.. चंद्र अजूनही उत्सवाची वाट पाहत आहे..रुमचा दरवाजा अजूनही बंद आहे.. एवढ असूनही तू अजून झोपलीच आहे.. कोमल तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधून तुला झोपेतच कशीबशी उचलून हॉस्टेलच्या रूमच्या दरवाज्या जवळ घेऊन येत आहे...दार उघडले असता... हलकी डोळ्यांवरची पट्टी काढलेली आहे...लिपलीप करत, उघडत असणाऱ्या डोळ्यांना आकाशातले तारे रुम मध्ये आल्यासारखे वाटत आहे...आणि कँडल पेटवताच चंद्र सुद्धा दिसायला लागला आहे...बॅकग्राऊंड मध्ये एक म्युसिक वाजत आहे...सकाळ अजून व्हायची आहे पण मैंत्रिणींचा किलबिलाहट सुरु झाला....happy birthday to you...happy birthday to you...happy birthday to dear Shitu... happy birthday to you...अखंड टाळ्यांसह ...केक तोंडाला लावत.फोटो काढत..हा कार्यक्रम आता संपलेला आहे....
आज नेहमीप्रमाणे
"रुम मध्ये येवून डुबुक डुबुक उड्या मारणारी....
केश किंग ची advertise.....
दबंग अंदाज सोबत close up confidence असणारी...
अशी आमची शीतल बाई..."
पोट दुखेपर्यंत हसत आहे....हो कि नाही....
"शहरे अनेक, देश अनेक, धरतीची आपली एकच माती..
सहेली आपण सगळे, टिकून राहो हि मैत्रीची नाती...
तू खूप मोठी हो , अशी आहे आमची इच्छा...
शीतल तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!!!!!!!!!!!"💗
This comment has been removed by the author.
ReplyDeleteHasaval aani radaval😘.....sarw aathaval......Thank you so much nehatli and Kombadi 😘😍......Ty😘
ReplyDelete❣️😍😍🍰
ReplyDeleteAmala ty nahi ...kitkat pahije ...hmmm😂😂
ReplyDelete