गॅलरीमध्ये बसून पेपर वाचत होते🗒️.सूर्याचा लखलखीत☀️ असा तेज प्रकाश होता. फार गरम होत होतं कारण आज जरा सूर्य जास्त तापलेला होता.
तेवढ्यात सोस्याट्याचा वारा सुटला..ढग गडागडायला लागले..वीज कडकडायला लागली..तितक्यात एक मोठं ढग सूर्यासमोर आलं..त्याने सूर्याचा काही भाग आपल्या पंखांखाली घेतला..अचानक डोळ्यांसमोर संपूर्ण दृश्य बदललं.. मेघ गर्जना झाली.. थेंब थेंब करत पावसाच्या सरी जमिनीवर पडायला लागल्या..उन्हाचे रूपांतर सावलीत झाले..वारा सैरा वैरा इकडून तिकडे पळू लागला..झाडे वेली , फुले बहरली..पावसाने अंगणात सडा शिंपला..सगळा निसर्ग हिरवा झाला..
पावसाकडे मी बघतच राहिले. पाऊस म्हणजे एक भूतकाळ , एक आठवण , पहिलं प्रेम, पहिली कविता..कधीतरी अचानक ढग दाटून यावेत, छान गार वाऱ्याची झुळूक यावी आणि पवासाचे थेंब अंगावरती पडावे..
मला लहानपाणापासून पाऊस खूप आवडायचा. पाऊस म्हटल कि, ते शाळेतून जाताना भिजणं, छत्री रेनकोट असूनही तो न वापरता मनसोक्त भिजणं, घरी आल्यानंतर आईने दिलेला गरम चहा घेऊन पुन्हा पावसात जाणं, कधी कागदाच्या होड्या बनवून खेळणं, कधी एकमेकांना चिखलात भिजवणं..
वाटायचं हा पाऊस कधी संपूच नये. रात्री झोपताना छतावर पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आवाज..
पाऊस म्हणजे पुन्हा लहान होऊन रस्त्यावरील पाण्यात उड्या मारणं..
पाऊस म्हणजे वाफाळलेला चहा..
पाऊस म्हणजे गरामागरम कांदा भजी..
पाऊस म्हणजे कडेला उभारून गरमागरम भाजलेले मक्याचे कणीस..
पाऊस म्हणजे हलकीशी गार वाऱ्याची झूळूक..
पाऊस म्हणजे पहिल्या सरीचा शिडकाव..
पाऊस म्हणजे मातीचा धुंद करणारा सुवास..
पाऊस म्हणजे इंद्रधनुष , तर कधी रौद्र रूप दाखवणारा पूर..
पाऊस म्हणजे भिजणं, आडोसा घेऊन हिरव्या निसर्गाला तासांतास बघणं..
खरंच पाऊस म्हणजे निसर्गाचं अप्रतिम असं सोंदर्य .......!!!!!!!!!!💗
Comments
Post a Comment