काका-काकू तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. काकू मला आठवते ज्यावेळेला फक्त एकदा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटली होती त्यावेळेला तुम्ही या नाजूकशा सुंदर चेहऱ्यावर, चांद्रकोरप्रमाणे गोडं हसणाऱ्या दिसल्या होत्या.
काका तुमच्याबद्दल काय सांगायचं, तुम्ही तर माझ्या जीवनात एक आदर्श गुरुंचं स्थान पटकावलं. तुम्हा दोघांशी नकळत झालेली भेट कदाचित गजानन महाराजांच्या कृपेने झाली असावी जी आजही मला मनातून एक आपुलकीचं नातं सांगून जातं.
खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असं तुमचंही नातं, ज्यात कोणतीही अपेक्षा न करता मिळालेली गोस्ट जी सुख देऊन जाते, त्याला तोड नसते..कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते...
आज एक नवा गंध, सुखांचा, वैभवांचा आनंद धावून आलेला आहे आणि या क्षणाला एक उजाळा देतो आहे, एक नवी दिशा, नवं स्वप्न देत आहे...
"आज तुमच्या जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी...
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात जुळून आल्या त्या रेशीमगाठी...
दोन जीवांचे प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेले...
असे हे परमेश्वराने जन्मोजन्माचे नाते ठरवलेले...
हळूहळू पुढे चालल्यानंतर कधी तुम्ही भांडले , तर कधी रुसता,
पण मात्र एकमेकांचा आदर नेहमीच करता...
"अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे" कधी एकमेकांना हळुवार असे बोलून जाता...
तुमचे हे बंधन एक रेशमाच्या नात्यात गुंफलेले...
लग्न-संसार का होईना पण जबाबदारीने फुललेले...
तुमचं नातं म्हणजे थोडं वेगळच हा, कधी एकमेकांचं औषध...
तर कधी एकमेकांच्या सुखाचे कारण...
आयुष्याच्या आकाशात ढग दाटून आलेत,
कधी सुखाची हलकी रिमझिम तर कधी दुःख घनदाट बरसले...
तरीही सुख-दुःखाचे थेंब हे तुम्ही स्वछंद झेलत राहिले,
आयुष्याची आव्हाने सारी तुम्ही मुलांसाठी अशीच पेरत राहिले...
खरंतर प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही...
तुमच्या मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही..."
काका-काकू तुमच्या समृद्धीच्या सागराचा किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. एकंदरीत तुमचं आयुष्य एक अनमोल आदर्श बनावं. हीच छोटीशी ईश्वरचरणी माझी प्राथना आहे आणि काका-काकू तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.. हिमांशू च्या शब्दात म्हणायचं तर ...तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर आणि ट्रकभरून शुभेच्छा!!!!☺️
खुप सुंदर लिहितेस नेहा❤👏
ReplyDeleteआणि खूप धन्यवाद 😇
आणि आई बाबा कडून खूप कौतुक आणि आशिर्वाद तुला 😊
❣️👌
ReplyDeleteHo nakkich ....ty☺☺
ReplyDelete