आकाशातील तारे हळूहळू अदृश्य होऊ लागले. एखादाच प्रभावी तारा आपले तेजस्वी अस्तित्त्व दाखवीत होता. पण, एकंदरीत मावळतीचे वेध त्यांना लागले होते. पूर्वेकडचे आकाश आता विविध रंगांनी उधळून निघाले होते. एखाद्या चित्रकाराने , आडवे तिडवे फटके आपल्या कॅनव्हासवर मरावेत त्याप्रमाणे क्षणाक्षणाला पहाट दृश्य बदलत होते.
बघता बघता पूर्व क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली. गुडूप दडलेल्या परिसराला हळूहळू जाग येत होती. पक्षांच्या किलबिलाटाने झाडांनाही जाग आली होती. आता सूर्य बराच वर आला होता. पूर्वेकडील तेजस्वी क्षितिज आपले अस्तीत्व क्षणाक्षणाला विस्तारित होते!!!
Comments
Post a Comment