प्रत्येकदा कवितेत लिहिलेला शब्दांचे अर्थ तेच असतात असं नसतं. जर कवितेत पृथ्वी हा शब्द रेखाटला असेल तर त्या पृथ्वीची तुलना आईशी पण होऊ शकते. तसेच आपल्या बाबांची/ वडिलांची तुलना मी पावसात दाटलेल्या आभाळाशी करते आहे. लहानपणी आपल्याच बाबाला भिणारी मी आज डोळे वर करून नजरेशी नजर मिळून बोलत आहे. लहानपणी रागवणारा माझा बाप आज मायेच्या प्रेमाने विरघळत आहे.
तर कविता सुरु करतेय..
गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ,
भीती वाटते त्याची कधी कधी,
पळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून,
त्याने डोळे उघडले तर, लक्ष-लक्ष एकदाच?
फोडून काढलं तर,
पावसाच्या चाबकाने विजेचा तिसरा डोळा भयकरी रागामध्ये,
आमीत लपेटून टाकेल आपल्याला?
त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय, मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही,
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असतं खरंतर...
जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणे,
एवढच आपल्या हातात,
तिची इच्छा असते आपला संवाद व्हावा आभाळाशी,
पण तीही मुक्याने आपलं कडू सत्य पचवत राहते,
आतले कढ आतच दाबत राहते,
हळूहळू अंतर वाढतं, वाढतच जातं,
क्रांती करायला लागतं मन वाढत्या वयानुसार,
आभाळाचं अस्तित्व झुगारून द्यायला लागतं,
ताठ मानाने त्याच्यासमोर उभं राहण्याचे,
आता हळूहळू आभाळंही म्हातारं व्हायला लागतं,
वयानुसार अनुभवाने आता वितळायला लागतं,
अशीच जेव्हा नजर आभाळावर जाते,
काळेभोर ढग निघून गेलेले असतात,
आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात,
शांत निरभ आभाळ तेव्हा कौतुकाने पहावं,
काहीतरी आपल्याही मनात उगाच दाटून येते,
हात पसरून , वय विसरून आपण मोठे होतो,
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो,
आभाळाच्या डोळ्यात तेव्हा आनंद अश्रू दाटून येतात,
सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होते....
🔥🔥 अप्रतिम ..🔥🔥
ReplyDeleteTy😊
ReplyDeleteछान👌
ReplyDeleteTy😊
ReplyDeleteWow..... Neha 💐💐.... exactly 👌👌
ReplyDelete