जाता जाता आषाढाने
घातली सुरेल साद...
हलकेच झेलून घेत
श्रावण देऊन बसला प्रतिसाद...
तुषार्त धरेला हवा होता
चिंब पाऊस धुव्वाधार
काळ्या ढगांच्या पखालीतून...
तेव्हा आषाढही कोसळला घनघोर...
हिरव्या शालूसवे आता
वसुंधराही सजली आहे...
रिमझिम सरींची आस
श्रावणात तिलाही आहे...
मनभावन हा सावन
मांगल्य देण्या येतो...
जगण्याच्या परावरती
ऊनसवली होऊन जातो...
कुठे वेगात धबधबा...
कुठे स्वच्छ तरल झरा...
हिरव्या रानाचे हिरवे गुपित...
जपण्या येती श्रावण धारा...
यावेळी माझा रंग जरा
भासतो ना न्यारा...
परिवर्तन घडविणाऱ्या
करोनाचा हा प्रताप सारा...
Comments
Post a Comment