बोलक्या स्वभाव असणाऱ्या माणसांची नाती सहजतेने जुळत जाते. मग अनोळखी व्यक्तींशीही घट्ट नातं जोडलं जातं. आणि माझ्याही बाबतीत काहीतरी असच घडलं असावं. कधी कोणी मदत केली म्हणून तर कधी कोणाला मदत केली म्हणून, अशीच ती नाती बनत जातात आणि मैत्री होत जाते. अनोळखी मैत्रीच्या सहवासात कधी मोलाचा उपदेशही मिळतो. अशीच मैत्री आणि मित्र-मैत्रिणींची साथ मागील काही महिन्यांपासून मला मिळत चालली आहे. पायी जात असताना,'चल बस कि गाडीवर' म्हणणारी अबोली, मुलीप्रमाणे जपणारे आणि त्रास होऊ नये म्हणून ऑफिस पर्यंत सोडून देणारे काका, बसमध्ये किंवा ऑटोत बसले असताना सारखे माझ्यासोबत गप्पागोष्टींचे खेळ रंगवणारे अंकिता आणि प्रियंका.
आणखी काही अनोळखी मित्र-मैत्रिणींची भेट सतत होत असते मात्र त्यांचं नाव विचारनं राहून जातं किंवा सांगितलं असतानाही मी विसरून जाते. ही अशी माझ्यासोबतची अनोळखी मैत्री काही काळापूर्ती राहणार हे ठाऊक असताना सुद्धा मला फार मोलाची वाटते.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
मैत्री जर काही काळापूर्ती राहत असेल तर मैत्री करायला भीती नाही वाटत का?
ReplyDelete