गडद निळेशार आभाळातुन पावसाचे पाणी हळू हळू पडायला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढत होता आणि मधेच कमी व्हायचा. जसजशी माझी पाऊलं रस्त्यावरून पुढे पुढे जातं होती तसतसा हा पाऊस मला वेगवेगळा भासू लागला.
कधी वाटलं झाडाच्या पानांवरून टिपटीप बरसणारा हा पाऊस..
तर कधी तापलेल्या धरणीला शीतल करणारा हा पाऊस..
कधी रस्त्यावर ओला सडा शिंपणारा हा पाऊस..
तर कधी मातीला ओलावा देऊन सुगंध चोहीकडे दरवळणारा हा पाऊस..
कधी जोरात पडून वाचण्यासाठी लोकांना पळवून लावणारा हा पाऊस..
तर कधी हलके पडून स्वतःचा नादात बेधुंद करणारा हा पाऊस..
खरंतर नजरेच्या स्पर्शामधूनी आणि नाजुकशा हसण्यामधूनी हा पाऊस मला बावरणारा, सवारणारा आणि अंगावरती गोडं शहारे आणणारा वाटतो. जितकं कौतुक करावं या रम्य पावसाचं तितके माझ्यासाठी कमीच!

Comments
Post a Comment