उन्हाळ्याचे दिवस असले कि ऊन तर असणारच. आणि त्यात नवताप सूरू झाला कि आणखी जास्त असते. अरे इतक्या उन्हात निघायचं का हा प्रश्न माणसाला उन्हात जाण्यापासून थांबवतो. आज ऊन फार जास्त आहे असे म्हणून सूर्याकडे सारखी तक्रार सुरु असतें. अलीकडे मजुरांना बघितलं तर, ते या कडक उन्हातही काम करताना दिसतात कारण त्यांना सवय झालेली असतें.
त्रास होतो म्हणून उन्हात जाऊ नये किंवा फिरू नये हा जर विचार केला, तर मला हे कडक ऊन कसं अनुभवयाला मिळेल?.
जेव्हा सूर्य स्वतः जळून या संपूर्ण पृथ्वीतलावर उजेड करतो, मग आपण या उन्हाला का भ्यायचं?.
या विचाराने आम्हा सर्वांचं जेवण झालं कि, आम्ही तिघेही भर उन्हात फिरायला निघतो. त्यात उमेशचंद्र सर, अभिलाष दादा आणि मी. जितके चटके लागतात उन्हाचे त्यापेक्षा कितीतरी पटीने उन्हात फिरायची मज्जा आहे हे आम्हाला आता माहिती आहे. हसत हसत गप्पागोष्टी करत चालताना, मंद हवेने हलताना झाडांच्या पाना-फुलांकडे बघायचं.
सामान्य किंवा गरीब काकांना मदत व्हावी या विचाराने, हिराव्यांकंच झाडांच्या गर्द सावलीत, रस्त्याच्या बाजूला टपरी वरील, उसाच्या गाडीजवळ येऊन थांबायचं. ऊस वाल्या काकांची तर मज्जाच वेगळी. दिसताच क्षणी हसणं आणि सांगताच क्षणी, काचेच्या तीन प्याला भरून थंड उसाचा रस तयार करून देतात. मग निवांतपणे आपला प्याला सावलीत बसून संपवायचा.
कारण आम्हाला माहित आहे, रोज उन्हाळ्यात उसाचा रसाचा एकच प्याला पिलं कि गर्मी पासून बचावं होते. शिवाय त्यात महत्वाचे पोषक घटक असतात जे हाडे मजबूत करण्यात मदत करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, पचन सुधारते आणि तणावं दूर ठेवते. उसामध्ये असलेले सर्वात प्रमुख अल्फा डायड्रॉक्सी ऍसिड जे त्वचेची चमक टिकवून ठेवाण्यास मदत करते.
आणि म्हणूनच भर उन्हात फिरण्यासाठी प्रेरणा देणारा हा आमचा उसाचा एकच प्याला सुरक्षा कवच देतं, रोज ठरलेला.

Comments
Post a Comment