काही दिवसापासून बसमध्ये गर्दी असल्याने घरी जाणं माझं ऑटोने असायचं. पण का कुणास ठाऊक आज बसने जायची इच्छा झाली. बस आली, बसमध्ये एकपण सीट नाही आणि वरून उभे राहणाऱ्यांची पण गर्दी फार.
या दाटीमुळे माझा चेहरा हिरमुसला पण रोज जाणाऱ्या काकांचा चेहरा थोडासा पण चिमला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. "बेटा आप इधर हो जाओ" असं म्हणतं त्यांनी मला उभं राहायला जागा दिली. ते म्हणाले, "एकदा माणसाला सवय झाली कि मग त्रास जाणंवत नसतो. त्यांच्या या बोलण्याने मी पण सहमत झाले कारण, कधी-कधी साध्या गोष्टी साध्य करण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतात. मग का म्हणून वेडेवाकडे चेहरे बनून करायचं, हसत हसत करायचं, असच मला त्या काका कडून समजलं.
या गोष्टी व्यतिरिक्त आणखी एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, एका म्हाताऱ्या आजोबांना, एका तरुण मुलाने स्वतः उठून त्यांना बसण्याकरिता सीट दिली. तरुणांमध्ये ताकद तर असते पण दयेचा सागर ही हवा. बसमध्ये दोन सीट वर तिघांना बसतानाही बघितलं. हे सगळं बस मध्ये बघून वाटलं कि माणसांसाठी माणसांना लागणारी माणुसकी वाढत चालली आहे.

Comments
Post a Comment