माझं आयुष्य .
मला वाटतं माझं आयुष्य सुगंधित फुलाप्रमाणे आहे , मग जिथे असेल तिथे सुगंध दरवळणे कधीच सोडत नाही .
कधी वाटतं माझं आयुष्य भरभरून बहरलेल्या झाडाप्रमाणे आहे , जे वादळात खंबीरपणे उभं राहतं , जे कडक उन्हात छायेसाठी आलेल्याना सावली देतं नि पावसात छत्री बनतं .
कधी वाटतं माझं आयुष्य फुलपाखरू प्रमाणे आहे विविधरंगी , कुठल्याही रंगात गेलं तर एक तरी रंग नक्कीच मिसळेल.
कधी वाटतं माझं आयुष्य जलाप्रमाणे आहे , चव तर नाही पण महत्वाचं .
कधी वाटतं माझं आयुष्य सूर्याच्या तेजाचं नि चंद्राच्या शीतलतेचं आहे .
कधी वाटतं माझं आयुष्य सागरासारखं आहे , जिथे मर्यादा आहेत पण पंख कापून आत ठेवणारा पिंजरा नाही . मर्यादा जरी असल्या तरी लाटा खुशाल मर्यादेपर्यंत जाऊन मानमर्जीने वापस येतात .
हो ना आयुष्य तर फारच सुंदर आहे
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment