योग्य कि अयोग्य ? हा प्रश्न कदाचित कित्येकदा माझ्या समोर असतो.
आज पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर होता. गोष्ट फार छोटीशी. आजीचं निधन झालं त्यामुळे घरी दुःखाचं वातावरण होत . जुनी चालत आलेली परंपरा आणि विधी - नियम . असं नाही चालणार / ते करू नये , असं सुरूच होत . नेहमी प्रमाणे मी आजही देवाजवळ दिवा लावला. अगदी निर्मळ मानाने - भावेने देवाकडे प्रार्थना केली . या परिस्थितीत येवढ मोठं वादळ माझ्यापुढे उभं राहील याची कल्पना नव्हतीच मला . सगळे माझ्यावरती ओरडायला लागले . "घरी कोणी मरण पावलं आणि हिला देवापुढे दिवा लावायचं सुचतंय ". मी शांत बसणाऱ्यांमधून नव्हतीच , मी प्रश्न केला ,"तुमच्या मधून सांगा मला कोणीतरी कि दिवा का लावू नये?
". त्यात मला उत्तर मात्र हेच मिळालं "देवावरची नाराजगी ". मग मी म्हणाले ,"मला मान्य आहे हे सगळं. मी फक्त आजवर, या विधी- नियम फक्त बघितले पण प्रमाण तर अजून सुद्धा नाही मिळालं मला . कोणाला मरण आलं तर देवाजवळ दिवा लावणे हे कसं चुकीचं ठरू शकतं?, त्यामुळे फार मोठा अनर्थ किंवा पाप घडेल हे मान्य नाही मला . मला माहित आहे यावेळेला सगळे दुःखात आहेत आणि म्हणूनच आज दिवा मी एक विशेष कारणासाठी लावलेला ते म्हणजे एक प्रार्थना निर्मळ मानाने केलेली अपल्या सर्वांकरीता . कि हे देवा माझा आजीला जिथेही कुठे ठेवशील तिथे सुखात ठेवशील आणि लवकरात लवकर या दुःखाच्या अंधारातून दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आनंद उजळू दे ".
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment