Skip to main content

निसर्ग


आज स्वप्नी माझा निसर्ग आला खरा,
का कुणा विचारू दिसला का तुम्हा !
निजले होते मी एकांती झाडाखाली,
उठल्यावरी दिसले निसर्ग हा समोरी !
होती राने-वने नी खळखळणारी नदी,
डोंगराची ती रांगे होती नदी किनारी !
डोंगराच्या मधूनी सूर्य हा उगवला,
का कुणा विचारू दिसला का तुम्हा !!

रंगेबिरंगी फुलं हे बागेत फुललेले, 
वाटे मला जणू का किती सुंदर बहरले !
पक्षांचा थवा हा आकाशी उडाला, 
तिकडे हळूच हा वाऱ्याचा शहारा !
हो अशी नवी पहाट दिसली ही मला,
का कुणा विचारू दिसला का तुम्हा !!

मन आनंदी झाले दृश्य पाहून सारे,
वाटे मला हे कधी न विसरावे !
निसर्ग दृश्य हे नयनी असे रमले,
स्वप्नी माझा हा निसर्ग भेटला,

वाटे मला हा भेटेल का पुन्हा..!!

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...