Skip to main content

आमचं नागपूर



नागपूरचे आराध्य दैवत आहे टेकडीचा गणपती,
आमच्या नागपूर शहराची काय वर्णावी महती..!

नागपूर शहर आहे महाराष्ट्राची उपराजधानी,
भारताच्या इतिहासात आहे प्रसिद्ध संत्रानगरी..!

नागपूरला जोपासल्या जातात संस्कृती आणि परंपरा,
जुन्या नव्याशी सांगड घालणे हाच आमुचा मंत्र खरा..!

नागपूरला लाभला आहे ऐतिहासिक वारसा,
भविष्याचा वेध घेऊन नवनिर्मितीचा आरसा..!

वाडा, घरे, फ्लॅट यांनी राखली नागपूरची शान,
वृद्ध, तरुण, मुले यांचा जमतो मेळ छान..!

कर्तृत्ववान व्यक्तींचा आहे आम्हाला अभिमान,
खरच आमचं शहर आहे महान..!

दिक्षाभूमी, संघभूमी, चर्च आणि मशिस,
सर्वधर्म समभावाचे हेच आहे प्रतिक..!

सण उत्सवाचा घातला जातो मेळ,
क्रीडा, चित्रकला, संगीत, नृत्यांचाही खेळला जातो खेळ..!

स्वच्छ सुंदर नागपूर शहर हाच अमुचा ध्यास,
पर्यावरणाचा समतोल राखला जातो खास..!

धावत्या मेट्रोची आहे आम्हाला उत्सुकता फार,
आधुनिकतेशी नाते जोडणे हेच जीवनाचे सार..!

शिक्षण हेच आमुच्या जीवनाचे तंत्र,
सुख-समाधानी राहणे हाच अमुचा जगण्याचा मंत्र..!

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...