Skip to main content

जिंकणे आमचे कि सर्वांचे

आज लहानपणीप्रमांणे मी आणि दादू म्हणजे माझा लहान भाऊ आई-बाबां बरोबर खेळलो. खेळ तो आमचा आवडता लगोरीचा. एका गटात आईबाबा आणि एका गटात आम्ही दोघे. आम्हा दोघांना पुरेपूर विश्वास होता कि जिंकणार तर आम्हीच. आणि आईबाबांना कदाचित स्वतः पेक्षा आमच्यावरती विश्वास होता. मग काय खेळण्याची रंगीन जादू सुरु झाली. आणि हा खेळ कसा पटकन संपला कळलं सुद्धा नाही. जिंकल्यानंतर आम्ही आईबाबांना हसत खेळत आणि खरंतर चिडवत म्हणालो, "आई बाबा आम्ही जिंकलो आणि तुम्ही मात्र हरले". तरीही आईबाबाच्या चेहऱ्यावर आनंद आमच्यापेक्षाही दुप्पट पटीने दिसत होता. आमच्या चिडवाण्यावर त्यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला, "माझी लेकरं जिंकली तर आम्ही पण जिंकलोच कि". या त्यांच्या शब्दाने सगळ्यांच्या मनावरती फक्त जिंकण्याच आदर्श समोर आणलं. आणि आम्ही दोघेही हसत मोठ्याने ओरडत म्हणालो, "या अर्थाने तर आपण चौघेही जिंकलो" म्हणजे हे जिंकणे फक्त आमचे नाहीतर सर्वांचे आहेत.

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...