आई आपल्या लेकरांना कधीच अंतर देत नाही. जिवंत असेपर्यंत तर नाहीच. लेकरांना
आपल्या डोळ्यादेखत झालेला त्रास तिला कधीच पाहवत नाही. जणू काही मोठं झाल्यानंतरही
तिच्या लेकरांचा सारा भार तिच्याकडे असावा असच तिला वाटत असावं. मी संस्काराने
आणि कर्तृत्वाने घडवालेल्या लेकरांना, मी नाही जपायचं तर कोण रक्षण करेल? हा प्रश्न
तिचा तिलाच सारखा पडत असतो. याच भावानेने मग नभाअंगणात जरी चंद्र-तरका निरोप
द्यायला आलेत तरी ती, मोठ्या ताठ मानेने उभी राहून त्याकडे मागणं करते, "मला स्वर्ग नकोय,
मला माझा लेकरांचं रक्षण हवंय".
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment