आकाशातील चंद्राकडे काही वेळ सतत बघितलं कि मन अगदी शांत होतं. त्यादिवशी अस्वस्थ
मनाने रस्त्यावरून चालत जात होते. रोजप्रमाणे आकाशाकडे बघितलं तर चंद्र तिथे
नव्हता. मी मनात म्हणाले, "जेव्हा दिसायच तेव्हा दिसत नसतो आणि जेव्हा नकोसा वाटतो
तेव्हा मात्र दिसतो". तेच थोड्या वेळाने चंद्र ढगामागून बाहेर हळू हळू आला. वाटलं
या आकाशाने माझी तक्रार एकली कि काय?. मग काय पुढे चालत जायचं नि चंद्राकडे अधून
मधून बघायचं. एवढंच माझही सुरूच. चंद्र ढगामागे लपयाचा आणि पुन्हा बाहेर यायचा.
हा लपंडावं त्याने सुरूच ठेवला तेही मी हसेपर्यंत. मग काय त्याचं हा खेळ बघून माझं
हसूच थांबेना. आता अस्वस्थ मन आनंदाने इतके हसायला लागले कि पोटात गुदगुदल्या
व्हायला लागल्या. चंद्र आणि ढगाचा लपंडाव खेळ बघून कधी तुम्हीही हसला असाल!.. हो
ना?
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
👌🏻👌🏻😍
ReplyDeleteThanks Ajay🤗🤗
Delete🌙✨👌🏻
ReplyDeleteThanks😊
Deleteहसलो होतो आम्ही, आता फक्त रडवतो तो, जिला चंद्राची उपमा दिली तिच्या आठवणीत....
ReplyDeleteकधी अर्धा, कधी पूर्णतःत्वात दिसणारा हा चंद्र हृदयावर आघातही करतो आणि हृदयही जिंकतो..