Skip to main content

आयुष्याचं पुस्तक...!


पहिलं आणि शेवटचं पान  विधात्याच्या हातून लिहिलं जातं,
मधले पानं आपल्यालाच लिहावं लागतं....

रंगीबिरंगी शाईने त्याला सुंदर रंगवायचं असतं,
नकळत का होईना पण ते आनंदाने सजवायचं असतं...

जोरात आलेल्या वाऱ्यामुळे पलटलेलं पान पुन्हा उघडायचं असतं,
काहीतरी लिहायचं असतं पण रिकामं कधीच सोडायचं नसतं...

रंगाची शाई संपल्यावर पेन्सिलनेही कधी रेखाटायचं असतं,
चूक झाल्यास मोठ्या मनाने ते खोडायचं असतं...

अर्धवट रिकामं असलेलं पान मन नसल्यास तसंच राहू द्यावं लागतं,
कारण ते फक्त रिकामं नाहीतर शांततेचं प्रतिक असतं...

ठेच लागली की शाई सांडते,
वेदना वाढल्या की पाणी सांडून ती शाईच पसरते...

काना-मात्रा सोबत सुवाच्छा अक्षरात एखादं पान लिहिल्या जातं,
तसंच जीवनातलं आनंद असंच बहरत जातं...

सुरुवातीला लिहितांना वाटतं अजून खूप बाकी राहिलं,
अर्ध भरल्यानंतर वाटतं आता फक्त अर्धच राहिलं...

लिहिता-लिहिता हातासारखे आपले आधारस्तंभ थकून गेलेले असतात,
पण शेवटी खूप काही लिहायचं राहील म्हणून पुन्हा धीर धरतात...

डोक्याची झीज, हाताच्या वेदना मनालाही कळतात,
अखेर मन जीवंत असतांना हात मात्र गळून जातात...

शेवटी लिहितांना पूर्ण विराम कुठे लावू असं मनच विचारतं,
मनाला तरी कसं सांगू शेवटचं पूर्ण विराम तर देवच लावतं...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...