Skip to main content

Posts

काकांचा समजदारपणा

त्या दिवशी सर्वांकारिता गुलाबजामून नेले. सर्वांना वाटल्यानंतर शेवटचा एक गुलाबजामून ठेवला तो संजू काकांकरिता. मी गुलाबजामूनचा डबा तिथेच ठेवला जिथे संजू काका नेहमी बसतात. आणि संजू काकांना सांगितलं कि, "काका तुमच्या करिता मी एक गुलाबजामून ठेवलेलं आहे ". त्यावर संजू काका हसत म्हणाले, "हो". कामात व्यस्त असल्याने मी लगेच तो डबा नाही आणू शकले आणि विचार केला, कि जाताना हा डबा मी सोबत घरी नेईल. काम पूर्ण झाल्यानंतर मी माझा डबा परत आणायला गेले. नक्कीच खाल्लं कि नाही हे बघण्यासाठी, मी जेव्हा डबा उघडला तेव्हा बघते तर काय, डबा चकाचक धुऊन तयार. खरंतर संजू काका गुलाबजामून खाऊन डबा तसेच ठेऊ शकत होते पण त्यांनी स्वच्छ करून ठेवला, हे बघून माझा आनंदाला पारावार नव्हता.

रागावून कि प्रेमाने

आज ती पुन्हा एकदा आपल्या आई समोर व्यक्त झाली, आणि आईला म्हणाली, " आई आज माझे सर माझ्यावरती रागावले. आज त्यांनी केलेल्या कॉमेंट मुळे असं वाटलं कि, ते माझा आदर आणि सन्मान कमी लेखत आहेत. म्हणूनच मी पण सरांवरती रागावले आणि त्यांना बोलले पण. ज्या सरांबद्दल आधी माझ्या मनात फार आदर होता तो आता नाही आहे. मला बिलकुल नाही आवडतं ते सर. ". यावर तिची आई हसली आणि तिला म्हणाली, "खरंतर सरांनी अशी विचित्र कॉमेंट केली असणार म्हणून तू रागावली ना. पण ती कॉमेंट तुझा सुधारणेसाठी होती हे विसरता कामा नये कारण समोरच्यांची परिस्थिती आणि दृष्टिकोन हे आपल्याला माहित नसतं. मी मान्य करते, जेव्हा मान आणि सन्मानाचा प्रश्न येतो, तेव्हा बोलणं चांगलं असतं. हे तू छान केलंस. पण शेवटी मी तुझी आई आहे आणि मला एक ठाऊक आहे, तेही तू फार रागावून बोलली असणार, ही चूक मात्र तू केली. ". ती म्हणाली, "तर मी करू तरी काय, तूच सांग ना?". आई म्हणाली, "अगं बाळा, जे तू रागावून बोललीस, ते तुला सहज प्रेमानेही सांगता आलं असतं. जेव्हा आपल्या सन्मानतेचा, आदराचा प्रश्न येतो त्यावेळेला टोचून बोलण्यापेक्षा,...

लाईट गेली म्हणून...

आज आमच्या घराकडील लाईट किमान अर्धा तासांसाठी गेलेली होती. रात्रीची वेळ आणि सर्वीकडे अंधारच अंधार. लाईट गेली असल्यामुळे सगळे आपली हातातली कामे बाजूला सारून घराबाहेर अंगणात आले. गप्पांना सुरुवात झाली. तेवढ्यात भरपूर जणांचं लक्ष गेलं ते या निळ्याशार आकाश्याकडे. सगळयांनी मन भरून उजेड देणाऱ्या चंद्राची आणि अवतीभोवती असणाऱ्या चांदण्यांची प्रशंसा केली. खरं म्हणजे लोक हे दृश्य बघून मनापासून आनंदी आणि प्रफुल्लित झालेत. चंद्र, तारे आणि आभाळ हे तर नेहमीच सुंदर दिसतात. आश्चर्य म्हणजे, या वेगवान जगात, आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. जेव्हा निसर्गासोबतचे काही क्षण इतकं प्रफुल्लित करतं तर विचार करा रोज जर थोडा वेळ आपण या निसर्गाच्या सानिध्यात घालवला तर आयुष्य किती आनंदी होईल.

स्वप्नात रंग यावे..

एक मुलगी जी अगदी साधी नि सुंदर आहे. तिने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप कष्ट घेतले. तिने तीचं अभियांत्रिकी पूर्ण केलय. पण नोकरी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले. आपल्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना नोकरी मिळाली पण मी मात्र एका विषयात नापास झाले या विचाराने ती दुःखी झाली. पण तिने ठरवले काहीही झालं तरी मला थांबून जमणार नाही. याच महत्वाकांक्षाने तिचा विषय निघाला आणि तिला पहिली नोकरी मिळाली ती पाच हजारांची. फक्त या पाच हजारासाठी ती कितीतरी किलोमीटर अंतर रोज गाठायची. कारण तीच एक स्वप्न होत आपली स्वतःची एक कार असावी. यासाठी तिने लागेल तेवढे प्रयत्न केले. याच परिश्रमाने ती आज एका चांगल्या पगाराच्या नोकरिवरती आहे. आज तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय तिच्याकडे आज तिची स्वतःची एक छान कार आहे. तिने सिद्ध करून दाखवले एक आवडतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता सतत प्रयन्तशील असणं फार महत्वाचे आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून ती मुलगी आहे अमृता काळे.