आज आमच्या घराकडील लाईट किमान अर्धा तासांसाठी गेलेली होती.
रात्रीची वेळ आणि सर्वीकडे अंधारच अंधार. लाईट गेली असल्यामुळे सगळे आपली हातातली कामे बाजूला सारून घराबाहेर अंगणात आले.
गप्पांना सुरुवात झाली. तेवढ्यात भरपूर जणांचं लक्ष गेलं ते या निळ्याशार आकाश्याकडे. सगळयांनी मन भरून उजेड देणाऱ्या चंद्राची आणि अवतीभोवती असणाऱ्या चांदण्यांची प्रशंसा केली. खरं म्हणजे लोक हे दृश्य बघून मनापासून आनंदी आणि प्रफुल्लित झालेत.
चंद्र, तारे आणि आभाळ हे तर नेहमीच सुंदर दिसतात. आश्चर्य म्हणजे, या वेगवान जगात, आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. जेव्हा निसर्गासोबतचे काही क्षण इतकं प्रफुल्लित करतं तर विचार करा रोज जर थोडा वेळ आपण या निसर्गाच्या सानिध्यात घालवला तर आयुष्य किती आनंदी होईल.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment