एक मुलगी जी अगदी साधी नि सुंदर आहे.
तिने तिच्या आतापर्यंतच्या आयुष्यात खूप कष्ट घेतले. तिने तीचं अभियांत्रिकी पूर्ण केलय. पण नोकरी लागावी म्हणून खूप प्रयत्न केले. आपल्या सगळ्या जवळच्या मैत्रिणींना नोकरी मिळाली पण मी मात्र एका विषयात नापास झाले या विचाराने ती दुःखी झाली. पण तिने ठरवले काहीही झालं तरी मला थांबून जमणार नाही.
याच महत्वाकांक्षाने तिचा विषय निघाला आणि तिला पहिली नोकरी मिळाली ती पाच हजारांची. फक्त या पाच हजारासाठी ती कितीतरी किलोमीटर अंतर रोज गाठायची. कारण तीच एक स्वप्न होत आपली स्वतःची एक कार असावी. यासाठी तिने लागेल तेवढे प्रयत्न केले. याच परिश्रमाने ती आज एका चांगल्या पगाराच्या नोकरिवरती आहे. आज तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय तिच्याकडे आज तिची स्वतःची एक छान कार आहे.
तिने सिद्ध करून दाखवले एक आवडतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेही न थांबता सतत प्रयन्तशील असणं फार महत्वाचे आहे.
ही मुलगी दुसरी कोणी नसून ती मुलगी आहे अमृता काळे.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Comments
Post a Comment