Skip to main content

Posts

व्यसनमुक्ति निर्धार

कित्येकदा ऑफिस मधून घरी येताना आयटी पार्कच्या रस्त्यावरील दुकानांमध्ये तरुण वयोगटातील मुले सिगारेट पितांना दिसतात. कधी घोळक्यात तर कधी एकटे ओढताना दिसतात. याने पर्यावरण तर दूषित होतं आणि आसपासच्या लोकांनाही श्वास घेताना त्रास जाणवतो. आणि हा विषय जर चर्चेत आणला तर त्यांना नकोसं होतं. कुणी म्हणतात, "It's just for fun and just maintain standard of living". हे ऐकून तर मी मात्र विचारात पडले. हल्ली तर शिक्षणासाठी बाहेर गेलेले विध्यार्थी कुसंगतीमुळे व्यसनाच्या वाईट मार्गावर जातात. नशा व अपयशाची नैराश्य यातून तरुणांच्या अनेक पार्ट्या होतात. व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये पाहायला मिळतात. व्यसनामुळे तरुणांची तेजस्विता नष्ट होते. अनेक रोगांना बळी पडून व्यसनाधीन माणसांना अकाली मृत्यू येत आहे. आणि म्हणूनच व्यसन लावून न घेणे हा कदाचित व्यसन मुक्तीचा पहिला मार्ग असू शकतो. आधी गावात एखादा जर दारू प्यायला तर अख्खा गाव, तो चुकीची गोष्ट करत आहे, या नजरेतून त्याच्याकडे बघत असे. आजची परिस्थिती विरुद्ध झाली आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली एखादा जर व्यसन नसेल करत, तर तो चुकीचं करत आहे य...

आनंदाचे वाटप

आजी नेहमी सांगायची की आपण आपल्या गुणांवरून स्वभावावरून ओळखले जातो. चांगला स्वभाव नि चांगले गुण असले की ती व्यक्ती चांगली आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण याहीपेक्षा पलीकडची पायरी चढणारे असतातच. जे स्वतः करिता, परिवाराकरिता नि दुसऱ्यांकरिता पण जगतात. आयुष्याच्या या वाटेवर पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तीशी ओळख झाली. भारदस्त व्यक्तित्व, आनंदी स्वभावाचे नि नेहमी हसत राहणारे असं काहीसं माझ्या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व. आमची फार छान ओळख झाली नि मैत्री पण. म्हणून कधी ते आम्हाला छान गोष्टी सांगतात तर कधी आम्ही त्यांना. त्या दिवशी पण बोलता बोलता त्यांनी सहज संगितलं, की आज छोटूच्या शाळेत आम्ही दान करून आलोय. ऐकून कानाला फार छान वाटलं कारण इतके मोठे असूनही कुठलाही गर्व न बाळगता कुणालाही मदत करणं हे त्यांच्या मूळ स्वभावातच. आणि म्हणतात ना की सद्गुणांची ज्योत जवळ असली की प्रकाशाला कुणीही थांबवू शकत नाही. हीच गोष्ट दसऱ्याला मी एका दादाला सांगितली. तर त्यानी पाच हार जास्त घेतले. मी सहज विचारलं का दादा? ते म्हणाले की आज दसऱ्याला वस्तुंना हार चढवणे/ त्यांची पूजा करणे नियम आहे. यातून काही ह...

त्यांच्याकरिता

रोजप्रमाणे त्या दिवशी पण ती ऑफिस मधून घरी जायला निघाली. मोठे रस्ते नि अजूबाजुला सिमेंट रेतीचे मोठया इमारती बघून तिला आनंद झाला. तिला कळलं की आपला भारत वेगाने प्रगतशील होत आहे. हा विचार करत ती पुढचं पाऊल टाकत गेली. समोर तिला एक गाय दिसली, तहानलेली होती त्यामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी पीत होती. तिला पाणी कमी पडू नये म्हणून तिने आपल्या बॉटल मधील पाणी दिलंय. ती पुढे निघाली. पण तिला पाण्याचं असलं कुठलाही स्रोत नाही दिसला ज्यात या परिसरात राहणाऱ्या जनावरांना-पक्ष्यांना पाणी देता येईल. तिचे विचार सुरू, भारत प्रगतशील च्या मार्गावर वेगाने भरारी घेत आहे. पण मग या वातावरणाची, पक्षांची-जनावरांची काळजी घेणं का विसरतोय? त्या दिवसापासून तिने या प्राणी-पक्षांसाठी पाणी ठेवायला सुरुवात केली. आज आपणही करूया नि एक पाऊल पुढे टाकूया.

मजा

दोन मिनिटात मॅगी तयार होणार, अर्ध्या तासात मशीन ने कपडे धुतले जातील,एका सेकंदाच्या आत हा संदेश दुसऱ्याला पाठवण्यात येईल , सोशल मीडिया अप्स ने एकासेकंदाच्या आत इमोशन बदलता येईल , दिवसाला मोबाईल द्वारे नाईट मोड पण सुरु करता येईल. तंत्रध्यानाचे असे कितीतरी उदाहरणे द्यावे तितके कमीच . काम तर सोपं झालं पण टाइम मॅनेजमेंट च्या धुंदीत संयम ठेवणे विसरतो आहे . लवकर पोहोचण्याच्या धुंदीत जाताना हवेचा अनुभव घेणं विसरतो असं काका म्हणाले. मी थोड्यावेळ स्तब्ध राहून ऐकत होते आणि नंतर विषय निघाला तो सभोवताली जीवनाचा. मग काय! काकांचं बोलणं मात्र सुरूच . पोरी शॉवर पेक्षा पावसाच्या पाण्यात भिजण्यात मजा आहे , कधी रस्तात एक मिनटं थांबून या भीरभिरणाऱ्या फुलपाखरांकडे बघण्यात मजा आहे, खचलं तरी संपलं नाही तर धीर धरण्यात आनंद आहे, पूजा दुसऱ्याच्या हातून नाही तर स्वतःच्या हातून करण्यात मजा आहे, पक्ष्यांसाठी आणि जनावरांसाठी अंगणात पाणी आणि खाऊ ठेवण्यात मजा आहे, प्रशंसा स्वतःची करण्यापेक्षा दुसऱ्यांची करण्यात मजा आहे, कपडे खराब होईल हा विचार करण्यापेक्षा साचलेल्या पाण्यात उड्या मारण्यात मजा आहे, न ...