आजी नेहमी सांगायची की आपण आपल्या गुणांवरून स्वभावावरून ओळखले जातो. चांगला स्वभाव नि चांगले गुण असले की ती व्यक्ती चांगली आहे असं प्रत्येकाला वाटतं. पण याहीपेक्षा पलीकडची पायरी चढणारे असतातच. जे स्वतः करिता, परिवाराकरिता नि दुसऱ्यांकरिता पण जगतात.
आयुष्याच्या या वाटेवर पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तीशी ओळख झाली.
भारदस्त व्यक्तित्व, आनंदी स्वभावाचे नि नेहमी हसत राहणारे असं काहीसं माझ्या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व.
आमची फार छान ओळख झाली नि मैत्री पण. म्हणून कधी ते आम्हाला छान गोष्टी सांगतात तर कधी आम्ही त्यांना. त्या दिवशी पण बोलता बोलता त्यांनी सहज संगितलं, की आज छोटूच्या शाळेत आम्ही दान करून आलोय. ऐकून कानाला फार छान वाटलं कारण इतके मोठे असूनही कुठलाही गर्व न बाळगता कुणालाही मदत करणं हे त्यांच्या मूळ स्वभावातच.
आणि म्हणतात ना
की सद्गुणांची ज्योत जवळ असली की प्रकाशाला कुणीही थांबवू शकत नाही.
हीच गोष्ट दसऱ्याला मी एका दादाला सांगितली. तर त्यानी पाच हार जास्त घेतले. मी सहज विचारलं का दादा? ते म्हणाले की आज दसऱ्याला वस्तुंना हार चढवणे/ त्यांची पूजा करणे नियम आहे. यातून काही हार मी माझ्याकडे काम करणाऱ्या काका-काकू ला देईल आणि एक चौकीदार काकांना. जर आज मी त्यांना बक्षीस म्हणून दिले तर त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य खुलून येईल. मी म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कदाचित मी नाही बघू शकणार पण आता जो माझ्या चेहऱ्यावरती आनंद उजळतोय तो मात्र कायम असणार जेव्हा जेव्हा मला असले सद्गुण आनंदाचे प्रसंग आठवतील.
आज बघा ना इतके मोठे असूनही, वेळात वेळ काढून त्यांनी मदतीची सुरुवात केली.
मग आपणही सुरुवात करूया
नि मदतीचा हात पुढे वाढवूया!

Ek dam zakkas !! Junior genius 🤪
ReplyDelete