Skip to main content

Posts

Happiest Anniversary !

काका-काकू तुम्ही माझ्या आईवडिलांसारखे आहात. काकू मला आठवते ज्यावेळेला फक्त एकदा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटली होती त्यावेळेला तुम्ही या नाजूकशा सुंदर चेहऱ्यावर, चांद्रकोरप्रमाणे गोडं हसणाऱ्या दिसल्या होत्या. काका तुमच्याबद्दल काय सांगायचं, तुम्ही तर माझ्या जीवनात एक आदर्श गुरुंचं स्थान पटकावलं. तुम्हा दोघांशी नकळत झालेली भेट कदाचित गजानन महाराजांच्या कृपेने झाली असावी जी आजही मला मनातून एक आपुलकीचं नातं सांगून जातं. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असं तुमचंही नातं, ज्यात कोणतीही अपेक्षा न करता मिळालेली गोस्ट जी सुख देऊन जाते, त्याला तोड नसते..कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते... आज एक नवा गंध, सुखांचा, वैभवांचा आनंद धावून आलेला आहे आणि या क्षणाला एक उजाळा देतो आहे, एक नवी दिशा, नवं स्वप्न देत आहे... "आज तुमच्या जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी... पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात जुळून आल्या त्या रेशीमगाठी... दोन जीवांचे प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेले... अ...

निसर्ग आणि मुले..

लहान मुलांचे आणि निसर्गाचे एक अनोखे नाते असते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे त्यांना आपसूकच एक कुतूहल असते. मुलांच्या विकासात त्यांच्या लहानपणीचे भाव अतिशय महत्वाची भूमिका बजावत असते. 'या पृथ्वीतलावावर असणारा निसर्ग हि अतिशय गुंतागुंतीची व्यवस्था आहे. मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही माशीनपेक्षा किंवा एखाद्या यंत्राणेपेक्षा हे जास्त गुंतागुंतीचे आहे. निसर्गातील हे सर्व बदल मुले संवेदनशीलतेने टिपतात निसर्गातील वैविध्य त्यांच्या नजरेत भरते. प्राणांमधील, पक्षांमधील ते मानवी आयुष्याशी संलग्न करून बघतात.' प्राणांच्या आयुष्याशीही ही मुले स्वतः तुलना करतात. त्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण करतात. बदल टिपतात. विशिष्ट प्राणी ज्याप्रमाणे वागतो तसंच वागण्याचा प्रयन्तही करतात. आकलनविषयक, सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकासामध्ये या साऱ्याची भूमिका महत्वाची आहे असे संशोधनातून सिद्ध झालेले आहेत.   मुलांना निसर्गाविषयी असणाऱ्या कुतुहलातून मोठ्या माणसांनीही खुप शिकण्यासारखं आहे. "थेअरी ऑफ माइंड " हेच सांगते , 'दुसऱ्याचा मनाचा विचार करून त्याच्या मनात काय असेल, याचा अंदाज घेऊन मुल...

एकांताचा आवाज...

एकटेपण ही तशी प्रत्येकाला बिलगलेली गोष्ट आहे. अगदी रूढ भाषेत, एकटच जन्माला येणं आणि जाणं ही गोष्ट कोणालाही टाळता आलेली नाही. एखादा कितीही गोष्टीवेल्हाळ, माणसात रमणारा माणूस असला तरी काही काळापुरता का होईना एकटेपणा त्याला हवा असतोच. मनाला चिकटलेली, नको असणारी चिरकुटं या काळात तो धुवून, काढून टाकत असतो. अर्थात, ही एकटेपणाची गोष्ट एकटेपणानच संपणारी नसते. त्याला बरच काही बिलगून आलेलं असतं. शरीराचं तसं अंतर्वस्त्र, तसंच मनाचही असावं. ते व्यक्त होतांना मग प्रथा, संकेत, नैतिकता, अनैतिकतेची वस्त्र परिधान करतं. आपल्या भोवतालाला टाळून आपण जगू शकत नाही. त्याचा अर्थ हा जो काही भोवताल आहे आपल्या विचार, जगण्याची दिशा ठरवतो. आपल्या वर्तनावर एकाच वेळी अनेक दबाव असतात. काही वेळा हा दबाव नाकरण्यातून आपण वर्तन करतो तर काही वेळा तो स्वीकारण्यातून. काही प्रक्रिया तर अगदी अंगवळणी पडल्यासारखं असतात. स्वीकार-नकाराच्या पलीकडलं त्यांचं आस्तित्व असतं. ती केवळ दैहिक नसते तर तिचे रूप हे बरेचसे भावनिक,मानसिक असते. या एकांताची मुळं खूप खोलवर आपल्या मनाशी रुजलेले असतात. भंडाऱ्याच्या डोंगरात बसलेले एकटेच तुकोबा ...

घेतला वसा टाकू नका!

लहानपणीच्या काही गोष्टीचे महत्व आणि त्यातून नेमकं आपण काय घ्यायला हवं हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं. अशीच लहानपणी वाचलेली गोष्ट...'शेवटचा घाव..!' एक माणूस नेहमीप्रमाणे लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला. काही लहान लहान काड्या गोळा केल्यानंतर आणखी काही मोठ्या फांद्या तोडाव्या म्हणून एका झाडावर चढतो. कुऱ्हाडीने एका फांदीवर सपासप घाव घालण्यास सुरुवात करतो. पण त्या झाडाच लाकूड फार चिवट असतं. बरेच घाव घातल्यानंतरही फांदी तुटत नाही. हि फांदी त्याच्या धैर्याची आणि चिकाटीची परीक्षा घेत असते. आता मात्र हा हताश होतो, धीर सुटतो. हतबल होऊन निराश अंतःकरणाने रडवलेल्या चेहऱ्याने खाली उतरतो. झाडाखालीच बसतो. काय करावं त्याला काहीच सुचत नाही! तितक्यात वाऱ्याच्या एक जोरदार झोत येतो, आणि त्या झोताने त्या झाडाची चिवट फांदी काडकन तुटते आणि पडते ती नेमकी या माणसाच्या डोक्यावरच!! परिणामी तो माणूस मरतो... ही गोस्ट वाचल्यावर मनात सहजच प्रश्न येतो, जर झाडाचं लाकूड इतकं चिवट असतं की कुऱ्हाडीचे अनेक घाव घालूनही फांदी तुटत नाही. तर मग वाऱ्याच्या एका झोताने ती फांदी तुटते कशी?? प्रश्न योग्य आहे..खरंतर ती...