कडक उन्हाच्या दिवसात पावसाची एखादी सर धरणीवर पडली कि मन अगदी आनंदाने न्हाऊन निघतं. आज सांजवेळी या पावसासवे जात असताना मला थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि मातीचा सुंदर सुगंध अनुभवास मिळाला. रस्त्यावरील रंगेबिरंगी फुले, पुन्हा नव्याने तवटवीत होताना या माझा छोट्या डोळ्यांना दिसली.
आणि ओल्या वाटेवरून चालताना, मनात ओलावा असणारी माणसं भेटली. मग काय रंगला खेळ तो या पावसाचा कौतुक करणारा. त्याच्या कौतुकाला तर पारावार नव्हताच.
जणू मला तर वाटायला लागलं कि, नभातील पडणाऱ्या गार पावसाने आणि त्याच्या प्रत्येक थेंबाने मन, डोकं आणि शरीर चिंब चिंब भिजवलंय.
जणू मला तर वाटायला लागलं कि, नभातील पडणाऱ्या गार पावसाने आणि त्याच्या प्रत्येक थेंबाने मन, डोकं आणि शरीर चिंब चिंब भिजवलंय.
Comments
Post a Comment