आज सुंदर एक मातीचा किल्ला तिने बनविला. मैत्रिणीला जेव्हा तिने तो किल्ला दाखविला तर तिच्या मैत्रिणीने तिला चिडवत, तो किल्ला मोडला. हे बघून ती रागे भरली आणि रडत आईजवळ गेली.
आईला म्हणाली, "आई माझा किल्ला मोडला गं तिने आणि मला तिचा खूप राग येत आहे."
त्यावर आई म्हणाली, "बरं बाळा, त्यात काय एवढं रागे भरायचं?".
मग ती म्हणाली,"आई एखादी मनापासून बनवलेली गोष्ट जेव्हा आपल्या देखत मोडेल तर, राग तर येणार कि. आई तुला कसचं का कळतं नाही?".
आई म्हणाली, "मग सांग बघू, पावसाच्या टीप-टिपत्या पाण्याने हा जर का तुझा आवडता किल्ला मोडला असता, तर तू काय केले असतें. पावसावर पण रागावली असती का?".
ती हसत म्हणाली, "टीप टीप बरसणारा पाऊस माझा खूप आवडीचा आहे आई. आणि का उगाच त्यावरती रागावले असतें!".
आई म्हणाली,"अगदी बरोबर. एखादी मनापासून केलेली गोष्ट जेव्हा हातून निघून जाते तेव्हा रागे भरून किंवा रडत बसून चालत नसतं, तर त्यातून नवं काही शिकायचं असतं".
आईचे हे ऐकून माझं मन समाधानाने हसतमुख झालंय.

Comments
Post a Comment