Skip to main content

Posts

पाऊस

रिमझिम-रिमझिम बरसे हा पाऊस, जिकडे तिकडे चोहीकडे | घरट्यात थांबून सारे पक्षी, न उडे आता नभाकडे || हिरवा शालू खूप पसरला, या ओल्याचिंब जमिनीवर | प्रसन्न होई माझे मन, जेव्हा पाऊस पडे धरतीवर || रानात मोर आनंदाने नाचतो | झाडावर कोकिळा गाणं गातो || हरीण बागडती मोकळ्या रानात | फुलांच्या गंधाने मोहित वातावरणात || तुला पाहून पावसा, अंतर्मन भारावले | नाही राहवत आता मी तुझ्यात हरवले || थेंबथेंबात स्पर्श तुझा, जीवाला मोहवतो | नकळतच हा जीव पुन्हा नव्यानं फुलवतो || ओलेचिंब भिजले आता, खूप मज्जा आली | गरमागरम चहा आणि भजी तयार झाली ||
Recent posts

मधेच आलेला पाऊस

उन्हात पावसाचा शिरवा आला खरा.. बघुनी मला वाटला तो बरा.. जरा जरा थेंब धरतीवर पडले.. माझे मन मात्र त्या थेंबात अडकले.. चिंब चिंब पावसाने केले ओले.. इतके की अंगावर आले शहारे.. शरीर झाले थंड मन झाले हलके.. शब्द माझे हे कवितेत झाले बोलके..

तारे

आकाशात होते आज असंख्य तारे, वाटलं हे इतके गोड का रे... "आकाश मोकळे आहे" अशी आई बोलली, बघते तर आकाशाने ताऱ्यांची जणू चादर ओढली... किती सुंदर हे इवले इवले तारे, बघून मोहित होतात सारे... जेव्हा ताऱ्यांमधून विमान जातो, तेव्हा आपण बघतच राहतो... लहानपणी वाटतं आपण तारा व्हावे, रात्रीच्या अंधकारात हलका प्रकाश द्यावे...

आई सारखं या जगात दुसरं कोणी नाही..

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" हे प्रसिद्ध गाजलेले वाक्य आजही जगात जिवंत आहे. "आई सारखं दैवतं या जगात नाही" हेही तितकंच. लहानपणी जे प्रेमाभावाने जपते ती म्हणजे आई... हिमालयाएवढे संकटाना सामोरे जाऊन मुलांना सांभाळते ती म्हणजे आई... आई होण्यापासून जिचं कर्तव्य मुलांकरिता मरेपर्यंत संपत नाही ती म्हणजे आई... जी दूर असूनही बाळाचं अंतरमन जाणते ती म्हणजे आई... बाळ कितीही कमजोर असलं तरी, माझं बाळ किती मजबूत आहे हा आत्मविश्वास जे जगवते ती म्हणजे आई... सत्यासाठी जेव्हा बाळ लढा देते तेव्हा, विरोधी कितीही असले तरी सत्य नेहमी जिंकत हे ठाम पणे सांगणारी ती म्हणजे आई... जगातील सगळ्यात मोठं सत्य म्हणजे आई... लाखो पैसे देऊनही जिचे संस्कार विकत घेता येत नाही ती म्हणजे आई... जिच्याकडे अमूल्य शिक्षणाचा खजिना असतो ती म्हणजे आई... जी बाळाला सांगते, अंधकारात तू प्रकाश बन, धरतीवर राहून तू तारा बन, काट्यात फुलासारखी उमल, जळूनही उजेड देणाऱ्या सूर्यासारखी बन, रडणाऱ्याच हसू बन, सत्याचा ध्वज बन, तू एक अशी मशाल बन.... तू एक अशी मशाल बन.....