Skip to main content

Posts

आज दिवस पावसाळी

स्वच्छंद वारा आणि आज नभ असे रंगले, नैसर्गिक परिसराचा आस्वाद घेत मी मात्र दंगले... कळींची फुलली फुले, पाने गळती सुरू झाली, अशा या सुंदर वातावरणाने आज बघा कमालच केली... पावसाचे हे ओले थेंब पडती जेव्हा अंगावरती, सगळे विसरुनी गुंतलेले मन पुन्हा पुन्हा मोकळे होती... जेव्हा कागदाचे जहाज पाण्यावरती अलगद तरंगते, तेव्हा आमचे कोलगेट चे दात आणि ओठ फार खुलून हसते... अश्या या पावसाळी झालेल्या वातावरणात जेव्हा समोर येतं गरमा-गरम चहा आणि त्याचा सुगंध, तर वाट न बघता तो चहा पिताना होतो आम्ही भरभरून दंग... खरंतर अजूनही खूप सुचतंय, कळत नाही आता या कवितेचा कसा करू अंत.... !!!

माझी मैत्री

माझे मित्रमैत्रिणी आहेत प्रेमळ स्वभावाचे, आहोत आम्ही साधे सरळ मस्तीखोर आणि मैत्रीभावाचे.. अधून मधून आला जरी कोणाला राग, तरी आम्ही करतो क्षणात त्याचा त्याग.. आमची ही मैत्री फार गोडं आहे, चव चाखून पहा किती दडलेली आहे.. आपली दोस्ती अशीच ठणठणीत राहिली पाहिजे, तिला टिकवण्याची हिंमतही जपली पाहिजे.. मैत्रीमधून अडकलं कोणी डबक्यात हे आपल्याला माहीत असणार आहे, मग आपण त्याला म्हणू "नको रे टेंशन घेऊ" उद्याचं जग आपलंच आहे..!!

जरा जगूया

जगून घेऊया क्षण हा आताचा, स्वपंखांना बळ देऊया.. डोळ्यांतील पापण्यात नवे स्वप्न रंगऊया.. प्रवासरुपी स्वपावलांना वाट शोधण्याची मुभा देऊया.. कानाला नवे तरंग ऐकण्याची प्रेरणा देऊया.. हाताच्या या मुठीला तारे मावतील इतके मेहनतीच्या आकांक्षाने विस्तृत करूया.. ओठांना सुर मधुर गाण्याचे स्वर देऊया.. या सखोल मनाच्या कोपऱ्यात निवांत शांतता विस्तारित करूया.. नियंत्रित मेंदूला सकारात्मकतेची दिशा दाखवूया.. कालची आजची सगळी चिंता सोडूया.. क्षण हा आजचा जरा जगूया.. नवा प्रवास, नवी दिशा, नवा तरंग, नवी लहर जीवनातील आपण छेडूया..!!

जगण्याचे रंग

ओंजळीतल्या जगाचे रंग न्याहाळंणं मोठं गमतीचं असतं. माणसाची, पशुपक्षांची, निसर्गाची फुलबहरण्याची धडपड सतत सुरु असते. सुखाची रंगीत बाग येथे फुललेली असते आणि मौजमजेची इंद्रधनुशी फुलपाखरं तीवर भिरभिरत असतात. कधी तडजोड, कधी लढाई असते या जगण्याचा रंगात..!