Skip to main content

Posts

माझी मैत्री

माझे मित्रमैत्रिणी आहेत प्रेमळ स्वभावाचे, आहोत आम्ही साधे सरळ मस्तीखोर आणि मैत्रीभावाचे.. अधून मधून आला जरी कोणाला राग, तरी आम्ही करतो क्षणात त्याचा त्याग.. आमची ही मैत्री फार गोडं आहे, चव चाखून पहा किती दडलेली आहे.. आपली दोस्ती अशीच ठणठणीत राहिली पाहिजे, तिला टिकवण्याची हिंमतही जपली पाहिजे.. मैत्रीमधून अडकलं कोणी डबक्यात हे आपल्याला माहीत असणार आहे, मग आपण त्याला म्हणू "नको रे टेंशन घेऊ" उद्याचं जग आपलंच आहे..!!

जरा जगूया

जगून घेऊया क्षण हा आताचा, स्वपंखांना बळ देऊया.. डोळ्यांतील पापण्यात नवे स्वप्न रंगऊया.. प्रवासरुपी स्वपावलांना वाट शोधण्याची मुभा देऊया.. कानाला नवे तरंग ऐकण्याची प्रेरणा देऊया.. हाताच्या या मुठीला तारे मावतील इतके मेहनतीच्या आकांक्षाने विस्तृत करूया.. ओठांना सुर मधुर गाण्याचे स्वर देऊया.. या सखोल मनाच्या कोपऱ्यात निवांत शांतता विस्तारित करूया.. नियंत्रित मेंदूला सकारात्मकतेची दिशा दाखवूया.. कालची आजची सगळी चिंता सोडूया.. क्षण हा आजचा जरा जगूया.. नवा प्रवास, नवी दिशा, नवा तरंग, नवी लहर जीवनातील आपण छेडूया..!!

जगण्याचे रंग

ओंजळीतल्या जगाचे रंग न्याहाळंणं मोठं गमतीचं असतं. माणसाची, पशुपक्षांची, निसर्गाची फुलबहरण्याची धडपड सतत सुरु असते. सुखाची रंगीत बाग येथे फुललेली असते आणि मौजमजेची इंद्रधनुशी फुलपाखरं तीवर भिरभिरत असतात. कधी तडजोड, कधी लढाई असते या जगण्याचा रंगात..!

शिक्षण

मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व अगाध आहे. संविधानाची वाटचाल बहात्तराव्या वर्षात आणि स्वातंत्र्याची वाटचाल पंचहत्तराव्या वर्षात होत असताना नव्या शैक्षणिक धोरणाने वेगाने होणारे जागतिक बदल टिपू नये, तथा भारतीय मूल्यव्यवस्था अधिक बळकट करण्याचा विचार करू नये ही खरे तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. बालकामगार, रस्त्यावरील बालके, आदिवासी समाजातील काही मुले, वीटभट्टी, दगडखाणीत काम करणाऱ्यांची मुले, आणि बांधकाम मजुरांची मुले शिक्षणापासून अजूनही वंचित असलेले दिसतात. गरीब-कष्टकऱ्यांनी दर्जात्मक शिक्षणाचा विचार करू नये असच काहीतरी झाले. एकीकडे मोफत शिक्षणाचा कायदा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याची अमलबजावणी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी हि तर हद्द झाली. शिक्षणाच्या नावाखाली एप्रिल फूल बनवतात की काय? देशाला एकसंघ, बलशाही, धर्मनिरपेक्ष आणि मूल्यात्मकदृष्टया आधुनिक करायचे असेल तर शिक्षणाकडे गांभीर्याने पहिले जाण्याची गरज आहे. कारण असीम करुणा पोटात वागवून मानवतेचे कल्याण साधणारी सुगंधाची वसाहत म्हणजे शिक्षण! नवनिर्मितीची हजारो क्षितिज उघडून देणारा प्रज्ञानाचा उजेड म्हणजे शिक्षण! सभ्यतेची वनर...