Skip to main content

Posts

माझ्या हृदयातलं एक मैत्रीचं पान

माझ्या हृदयातलं एक मैत्रीचं पान डिप्लोमा झाल्यानंतर अभियांत्रिकीसाठी "संत गजानन कॉलेज🕍" मिळालं. आई-बाबा 👨‍👩‍👧पासून दूर जाण्याची माझी पहिलीच वेळ होती. बाहेरचं जग किती मोठं आहे हे माहित होतं पण कसं आहे याची कल्पना नव्हती. सगळ्यात मोठा प्रश्न "घरापासून लांब अंतरावर असणाऱ्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर मित्र-मैत्रिणी चांगल्या मिळतील कि नाही?" म्हणतात ना कि प्रत्येक प्रश्नाची उत्तरे विचारायची नसतात तर ती स्वतः शोधायची असतात पण माझ्या या प्रश्नच उत्तर मला सहज मिळत गेलं तेही नशोधता.                             माझ्या इंजिनिअरिंगचा पहिला दिवस होता, मी हॉस्टेलला 🏙प्रवेश केला. मला मिळालेल्या रूमला लॉक🔒 होतं. आजूबाजूला विचारलं असता ते म्हणाले कि येईल थोड्यावेळात. थोड्यावेळ वाट पाहिल्यानंतर ती अली. तिने दार उघडलं. त्यावेळेला तिची आणि माझी पहिलीच भेट. त्याक्षणी कळलं कि आम्ही रुममेट्स आहोत. रुमध्ये 👭काही पुरेशी व्यवस्था नव्हती त्यामुळे तिने मला जड पलंग आणायला, माझं सामान लावायला😇 मदत केली. हळूहळू आमच्या गप्पा सुर...

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

अविस्मरणीय दिवस(भाग-२)

अविस्मरणीय दिवस(भाग-२) शेवटच्या दिवसाची भेट हि पुणेमधील "रामकृष्ण" कंपनीची.🏢कंपनीचं नावं हे देवाचं 🙏नाव,आणि येथील काम करणारी माणसं देखिल धार्मिक विचारांची. म्हणतात ना, "विज्ञानाला  अध्यात्माची  जोड असावी" तेथील मॅडम-सरांनी आम्हाला नोकरीबद्दल, कंपाणीबद्दल माहिती दिली, त्यांनी अनुभवलेले अनुभव सांगितले.😇🙂एवढच नाहीतर "खरंतर आपण काय शिकतो, आणि कंपनीमध्ये नेमकं काय घडतं" यातला फरक देखील सांगितला.  त्यामधील एक भारदस्त व्यक्तीमत्त्व🙂, निर्मळ स्वभाव😇,चेहऱ्यावर गोड हास्य असणारे😊, ज्यांच्या गोड वाणीने श्रोत्यांचे मन जिंकून घेणारे वक्ता म्हणजे "योगेश्वर कस्तुरे" सर. ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय? हे सांगतांना त्यांनी एक साधं उदाहरण दिलं. एक चोर असतो त्याला त्याच्या मुलाला ट्रेनिंग द्यायची असते. हे ट्रेंगिंग देणार तरी कसं?🤔 हा प्रश्न त्या अनुभवी चोराला पडतो. तो त्याच्या मुलाला म्हणतो, "चल 🚶आता ट्रेनिंगला". चोर त्याला राजवाड्यात घेऊन जातो. त्याच्यासाठी हि चोरी म्हणजे "एखाद्या मोठया कंपनीमधील 🏙ट्रेनिंग.." "ट्रेनिंगमध्ये...

अविस्मरणीय दिवस(भाग-१)

अविस्मरणीय दिवस(भाग-१) आठवणीतले काही क्षण आठवले कि नकळत आनंद देऊन जातात आणि ते आठवणीतले क्षण म्हणजे पुणेला गेलेली कॉलेजची चार दिवसांची सहल.😄हे दिवस आठवलेकी सर्वांत आधी आठवतं ते पहिल्याच दिवशी कितीतरी वेळ वाट पाहायला लावणारी ती बस.🚌त्याच बसमधून पुढे प्रवास केला तो आळंदीचा🕌, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थान, भक्तांच्या दर्शनासाठी 🙏लाभलेली अशी हि पावन पुण्यभूमी. पहिल्या दिवशी "गजानन महाराज संस्थान आळंदी" भक्तनिवास मध्ये मुक्काम केल्याननंतर दुसऱ्या दिवशी निघालो ते पुणेतल्या कंपनीला🏙 भेट द्यायला. पुणेचा प्रवास हा अगदी रोमांचक होता.😍 खिडकीच्या बाहेरून डोकावताना बघितलेली ती पहाड🏞,तो निसर्ग निराळा 🏝आणि फुलणारा होता. जिकडेतिकडे धुकं च धुकं नि खिडकीतून तो बसमध्ये आता शिरणार, झुळझुळणार थंडगार वारा. पुणेमधील मोठमोठाली कंपनी आम्ही बघितली, persistent, LTI इत्यादी. त्यातल्या ऐका कंपनीला भेट दिली ती  E-zest.🏙 प्रवासातील तिसरा दिवस हा कधी न विसरणारा,नेहमी आठवणीत राहणारा.😍त्यादिवशी आम्हाला आमचा स्वप्नातला दिवस सत्यात उतरल्या सारखा वाटला😊. ते स्वप्नातलं जग म्ह...