Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

आनंदी

आई ही अशी दैवत आहे जी आपल्या मुलांना खूप जपते, त्यांना घडवते, कुठल्याही परिस्थितीत आपण कसं आनंदी राहू हे शिकवते. त्यादिवशी मी नाराज होते तेव्हा आईने मला एक साधी गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी, एक मुलगा फुगा घेण्यासाठी त्याच्या आईकडे हट्ट धरतो, कारण त्याला त्या फुग्यासोबत मनसोक्त खेळायचं होते. हट्ट बघून आई त्याला फुगा घेऊन देते. मग तो मैदानावर सतत त्या फुग्या सोबत इकडून तिकडे, कितीतरी वेळ, अतिशय आनंदाने खेळत राहतो. मुलाचा आनंद बघून तिच्याही चेहऱ्यावर हास्य खुलते. पण अचानक तो फुगा त्याच्या हातून सुटून आकाशाच्या दिशेने उडायला लागतो. तेव्हा त्याच्या आईला वाटते आता हा पुन्हा हट्ट धरणार. पण तो फुगा उडत दिसताना आणखी आनंदी होतो, खळखळून हसायला लागतो. बस एवढीच ही गोष्ट, असं सांगून माझ्या आईने मला प्रश्न केला, सांग बर तुला यातून काय शिकायला मिळालं. यावर आईला मी म्हटलं, आई हे बघ, आता मला काहीही सुचत नाही आहे. तूच सांग बघू. आईने सांगितलं, "आपण गोष्टीतल्या छोट्या मुलासारखं असावं, त्याच्याकडे त्याच्या आवडीचा फुगा होता म्हणून तो फार आनंदी होता. आणि जेव्हा त्याचा हातून तो फुगा निघून गेला, तेव्ह...

ओलेचिंब

मंद वारा होता आणि पावलं चालत होती. काळ्या ढगांच्या अंधकारात सृष्टीत काळोख पसरलेला होता. डोळ्यांनी रस्ता पाहण्याचा प्रयन्त केला पण तो ही नाहीसा झालेला दिसला. आकाशात वीजा कडकड आवाज करत जोरात चमकायला लागल्या. विजेच्या प्रकाशाने कळलं कि समोर रस्ताच रस्ता होता आणि कडेला गर्द हिरावी झाडें. वारा दिशा बदलत इकडून तिकडे धावत होता. पाखरं घरट्यात परतत होती. अचानक पावसाला सुरुवात झाली. माझा पावलांनी लगेच वळण घेतलं आणि झाडाखाली येऊन थांबली. पावसाचा वेग वाढत गेला. आपण भिजतोय म्हणून स्वतःला पावसापासून थांबावंण्याचा प्रयत्न केला पण शेवटी चिंब चिंब या पावसात भिजले.