आज बॅडमिंटन खेळत असताना एका लहान मुलीने विचारलं, "मी पण खेळू ताई".
ती लहान आहे आणि तिला कसं जमणार या विचाराने आम्ही तिला नाही म्हटलं. जेव्हा तिने तिसऱ्यांदा विचारलं, तेव्हा तिचा नाराज चेहरा बघून मी तिला होकार दिला. तिने माझ्यासोबत खेळायला सुरुवात केली.
ती प्रयन्त करत राहिली पण तिला जमेना. तिला सगळे म्हणाले, "आता मला दे बघू, झालं तुझं खेळणं. नाही जमणार तुला". पण कुठेच लक्ष न देता ती सतत खेळत राहिली. आणि शेवटी शेवटी तीला जमलही, "मी तिला म्हटलं, अरे वा, नव्या तुला जमतंय".
यातून एक मात्र मला समजलं, जेव्हा सगळे तिला नाही म्हणाले, पण ती मात्र अटळ, हरणं तिला माहित नव्हतं पण जिंकणं हे तिचा चेहऱ्यावर आधीच दिसत होतं.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Khup chhan Neha..
ReplyDeleteThank you Shubhu✨️
Delete👍👍
ReplyDeleteKhup Chhan Moundekar
ReplyDelete