दिवसभर काम करून संध्याकाळी निघण्याची तळमळ सुरु होते. त्याही दिवशी होतीच पण डोक्यावरती कामाचा तणावं जरा जास्त होता. आणि मग काय, "चल हर्षु कॉफी". पाच मिनिटांमध्ये सर्वकाही आटोपून कॉफी मशीनजवळ पोहोचायचं. मग दोन कपामध्ये कॉफी भरून कधी तिने मला तर कधी मी तिला द्यावी.
कॉफी पीत आमच्या गोष्टींचा खेळ रमायचा.
कामाचा तणावं विसरून नवीन विचारांना सुरुवात व्हायची आणि डोक्यावरती काळजीचं साचलेलं आभाळ ओठांवरती हसू बनून उजळायचं.
कॉफी सोबत दहा मिनिटं घालवताना आमची "कॉफी वाली यारी" घट्ट होत चालली आहे.
कामाचा तणावं विसरून नवीन विचारांना सुरुवात व्हायची आणि डोक्यावरती काळजीचं साचलेलं आभाळ ओठांवरती हसू बनून उजळायचं.
कॉफी सोबत दहा मिनिटं घालवताना आमची "कॉफी वाली यारी" घट्ट होत चालली आहे.
Comments
Post a Comment