आज पुन्हा हे सगळे नवे वाटले,
उमलून आलेली ती नवी फुले, रोज धरणीवर पडणारी सूर्याची नवी किरणे..
जुन्या क्षणांना नवी बनवणारी कल्पना, नव्या दिशेस वाहणारा नवा वारा..
नकळत रुजणारे नवे क्षण, हरवून बेभान होणारे नवे मन..
निळ्याशर नभात उगवणारा नवा चांदवा, उन्हात हलका मिळणारा नवा गारवा..
नवी उंच भरारी घेणारे नवे पक्षी, नव्या आभाळात नवी ढगाची नक्षी..
नव्याने चमकणारी नवी रातचांदणी, नव्या पाऊलवाटेवर नव्याने चालणारे पाय दोन्ही..
नवी नाती नवी धुंद, नवा रंग नवा बेधुंद..
नवा ऋतू नवा भास नवा हर्ष, नवी मैत्री नवं प्रेम नवा स्पर्श..
नवी शाई नवा कोरा कागद, नव्या शब्दासवे नव्या कवितेचं, कोऱ्या कागदावरती स्वागत..

Comments
Post a Comment