वहीचं पाहिलं पान उघडलं की काय लिहावं ते सुचत नाही,
कारण शब्द भरपूर असतात, शब्दांचा मेळ मात्र जुळत नाही..
मग आकाशाला आठवावे,जमिनीला आठवावे, पाण्याला आठवावे, पण प्रश्न मात्र एकच शेवटी कसं आणि काय रेखाटावे..
प्रश्न असाच मनात भिनतो, बघता-बघता वाट पुढची दाखवितो..
कडक उन्हात आकाश आकाशी रंग उधळविते, मग माझी पेनाची निळी शाईही, कागदाच्या कोऱ्या पानावर रंग खेळते..
ना शाईला ना पानाला माहित नव्हतं एवढं मात्र मान्य आहे, पण मनालाही माहित नव्हतं हे मात्र अशक्य आहे?
मेंदूने हळूच इशारा केला मनाला, वही आली आता संपायला, थांबवा जरा शब्दांना, लागा आपल्या कामाला....!!!

Comments
Post a Comment