माझ्या हातांनी मी
माझा सत्कार केला,
आलेल्या सत्काराला मी
जेव्हा नकार दिला..!
सत्कारासाठी कारण तसे
बिलकुल लागत नाही,
गल्लीभूषण, आळीभूषण
हल्ली चालते काही..!
सत्कार झालेले महात्मे
दोन बोटे वरून चालतात,
प्रसंगी देवाला सुद्धा
तू कोण,विचारात..!
हल्ली जग हे देखाव्याचे
विनासायास मोठे होण्याचे,
आरश्यात स्वतःला बघताना
आंधळ्या प्रेमात पडण्याचे..!
स्वतःला स्वतःची लाज
वाटण्याची दिवस संपले,
कितीही भ्रष्ट झाले तरी
फीत कापायला पहिले..!
संपायला हवेत हे
सत्कारांचे वृथा सोहळे,
शोधायला हवेत खरे
नात्यांमधले धागे कोवळे..!
👌👌💐
ReplyDeleteमस्त लिहिलंय 😘
ReplyDeleteअप्रतिम...👌आणि शब्दरचना ...Wow 😯...🙌 छान लिहितेस...😍😊👌👌
ReplyDeleteMst
ReplyDeleteVery nice lines😍😍😍 heart touching 👍🏻👍🏻👍🏻superb keep it up
ReplyDeleteKhup chaan 🙌
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteKhup sundar mam😍👌
ReplyDelete🙌🙌🔥💥
ReplyDeleteKhup chan✌️
ReplyDeleteखुपचं सुंदर तुझं लेख...
ReplyDelete