अविस्मरणीय दिवस(भाग-१)
आठवणीतले काही क्षण आठवले कि नकळत आनंद देऊन जातात आणि ते आठवणीतले क्षण म्हणजे पुणेला गेलेली कॉलेजची चार दिवसांची सहल.😄हे दिवस आठवलेकी सर्वांत आधी आठवतं ते पहिल्याच दिवशी कितीतरी वेळ वाट पाहायला लावणारी ती बस.🚌त्याच बसमधून पुढे प्रवास केला तो आळंदीचा🕌, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी स्थान, भक्तांच्या दर्शनासाठी 🙏लाभलेली अशी हि पावन पुण्यभूमी.
पहिल्या दिवशी "गजानन महाराज संस्थान आळंदी" भक्तनिवास मध्ये मुक्काम केल्याननंतर दुसऱ्या दिवशी निघालो ते पुणेतल्या कंपनीला🏙 भेट द्यायला. पुणेचा प्रवास हा अगदी रोमांचक होता.😍 खिडकीच्या बाहेरून डोकावताना बघितलेली ती पहाड🏞,तो निसर्ग निराळा 🏝आणि फुलणारा होता. जिकडेतिकडे धुकं च धुकं नि खिडकीतून तो बसमध्ये आता शिरणार, झुळझुळणार थंडगार वारा.
पुणेमधील मोठमोठाली कंपनी आम्ही बघितली, persistent, LTI इत्यादी. त्यातल्या ऐका कंपनीला भेट दिली ती E-zest.🏙
प्रवासातील तिसरा दिवस हा कधी न विसरणारा,नेहमी आठवणीत राहणारा.😍त्यादिवशी आम्हाला आमचा स्वप्नातला दिवस सत्यात उतरल्या सारखा वाटला😊. ते स्वप्नातलं जग म्हणजे "Imagica". थीम पार्क🌱, वॉटर पार्क⛲,स्नो पार्क असं सगळं एकत्रित असणारा हा पुणेमधील "Imagica park". नायट्रो रोलर-कोस्टर🎢,डिप-स्पेस🎢, डेयर-टू-ड्रॉप, मिस्टर इंडिया👲 मधील मस्ती, स्नो पार्क मधला आनंद🤗,निसर्गातील ती पहाडं,झाडवेलींची ती हिरवळ🌲🌱🍀,पाण्याचा धबधबा ⛲आणि अत्सीत्त्व नसलेले प्राणी डायनासॉर..हे दर्शवणारे जुरासिक वर्ल्ड.
अश्या या "imagica" मध्ये कितीतरी दिवसानंतर सगळ्यांच लहानपण उजळून आलं.
(शेवटच्या दिवसाचे अनुभव भाग-२ मध्ये...)
Khup chhan 👌 keep it up
ReplyDeleteTy😊
ReplyDelete