Skip to main content

Posts

Showing posts from July, 2025

पाऊस

रिमझिम-रिमझिम बरसे हा पाऊस, जिकडे तिकडे चोहीकडे | घरट्यात थांबून सारे पक्षी, न उडे आता नभाकडे || हिरवा शालू खूप पसरला, या ओल्याचिंब जमिनीवर | प्रसन्न होई माझे मन, जेव्हा पाऊस पडे धरतीवार || रानात मोर आनंदाने नाचतो | झाडावर कोकिळा गाणं गातो || हरीण बागडती मोकळ्या रानात | फुलांच्या गंधाने मोहित वातावरणात || तुला पाहून पावसा, अंतर्मन भारावले | नाही राहवत आता मी तुझ्यात हरवले || थेंबथेंबात स्पर्श तुझा, जीवाला मोहवतो | नकळतच हा जीव पुन्हा नव्यानं फुलवतो || ओलेचिंब भिजले आता, खूप मज्जा आली | गरमागरम चहा आणि भजी तयार झाली ||