आज आईसोबत फिरताना सहज आकाशातील चंद्राकडे नजर गेली. चंद्र हलका सोनेरी रंगाने रंगलेला होता. आईला म्हटलं, "आई बघ ती सोनेरी चंद्रकोर". आईला पण आश्चर्य वाटलं, आज चंद्राची कोर का बर सोनेरी दिसत आहे?
एरवी पांढराशुभ्र दिसणारा हा चंद्र आज सोनेरी कसा काय?
कधी नं वाटणाऱ्या गोष्टी पण सत्य असतात आणि आश्चर्य देऊन जातात.
गप्पांमध्ये आई ने एक प्रश्न केला, "नेहा सांग बघू आपल्याला चंद्राकडून काय शिकवण मिळते?"
मी विचार केला आणि म्हटलं, "माणसाने ना चंद्रासारखं शीतल असावं".
आई त्यावर म्हणाली, "नाही नाही आणखी आहे बर का".
मी म्हणाली, "बर आई तूच सांग कि आता, मला नाही माहिती काय ते".
आईने सांगायला सुरुवात केली, "हे बघ नेहा, चंद्र जरी पांढराशुभ्र दिसत असला पण सत्यात तर त्यावरती काळे डाग आहेत. म्हणजे पूर्णरूपाने तो पांढराशुभ्र नाहीच तरीही रात्रीच्या अंधारात प्रकाश देण्याचं काम तो करत असतो. तसंच माणसांचंपण असतं, माणसांजवळ सर्वच सद्गुण असणार असं शक्य नाही काही दुर्गुणही असू शकतात, पण तो आपल्यातील सदगुणांचा उपयोग जीवन प्रकाशमय करण्यासाठी नक्कीच करू शकतो."
आईचे शब्द ऐकून वाटलं, बाजू दोन आहेत, निवडणे आपल्या हाती.
मनाची साठवण ...शब्दांची आठवण...
जन्माला आला आहेस..थोडं जगून बघ.. जीवनात असतील रे दुःख..थोडं हसून बघ .. काय, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस.. दुःखचं पहाड चढून बघ.. अपयशाला थोडं निरखून बघ.. यशाची चव चाखून बघ.. जीवनाचं कोडं फार कठीण नसतं रे.. येता-जाता सोडवून तर बघ .... !!!
Agadi barobar khup chhan neha
ReplyDelete