एक प्रेम असही (भाग 1)
आजही रोजच्या प्रमाणे ट्रेन पकडण्याची घाई होती. मी ट्रेनमध्ये बसलो. सगळ्यात आवडीची सीट म्हणजे खिडकीजवळाची.
"आज ऊन जरा जास्त होती. अचानक आभाळ गडागडायला लागलं. बाहेर हिरवळ. आकाशाचा निळा रंग काळा व्हायला आला होता. फवाऱ्याप्रमाने पावसाच्या वर्षावाला सुरुवात झाली."
तासभर खिडकी बाहेर सारखं बघत होतो. पण लक्ष फक्त मनातल्या विचारांकडे होतं.
"वाटे कोरड्या जगात माझ्या आहे चार भिंती,
बैचेन स्वप्नांची पाखरे हरुनी जाती,
नि माझ्या आशा क्षणात फिरती,
पण मनाच्या या विचारांना मी आवरू तरी किती,
मनातले हे सारे सांगू तरी कुणा?"
तरीही क्षणा क्षणात इवल्याश्याया मुठीप्रमाणे हसलो. मनाच्या मनात गुंतलेल्या मनाला मोकळं करण्यासाठी बॅगमधून हेडफोन काढले. माझी आवडती प्लेलिस्ट सुरु केली. ट्रेन जंकशनवर येऊन थांबली. ट्रेन सोबतच दुसरं गाणंही सुरु झालं. "तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम... " गण्यासोबतच चित्रपटातलं सिन सुध्दा सुरु झालं.
"आज पाहिले तिला मी जोरात धावताना, तिचे सुंदर केस वाऱ्याप्रमाणे उडतांना, ओढणी हवेत तरंगताना, कमरेत थोडी लवचीकता, कानात सोनेरी रिंग, पायात पंजाबी बूट, एक हाताने छत्री तर दुसऱ्या हाताने सुंदरश्या पंजाबी ड्रेसला सवरतांना." मी पाहता दंग झालो असा वाटे माझ्या परी कथेतल्या पऱ्यांमधली हीच ती नव्या दुनियेतील पऱ्यांची राणी.
मग अलगद डोकं काचेला टेकवत, तिच्याकडे बघत, बॅकग्राऊंड मध्ये सुरु असलेलं गाणं गुणगुणु लागलो "तुझे देखा तो ये जना सनम..मैं तो हो गया दिवाना सनम .." तिने जोरात धाव घेतली. हळूहळू ती माझ्या खिडकीजवळ अली. मी तिला बघून हळुवार हसत आपल्या स्वप्नातल्या जगात होतो. तिचा भास मला हवासा वाटत होता.
"प्लीज गाडी रोको " असं ती जोरात ओरडली.
पण गाडीचा वेग वाढत गेला. ती मागे होत गेली. तिच्यातील आणि माझ्यातील अंतर वाढत गेलं. तिची ती गुलाबी छत्री तिच्या हातून सुटून उडत माझ्या खिडकीला अडकली. जणू देवाने मला संदेश दिला तिची मदत कर वेड्या असं जागेवर गप्प बसू नकोस. माझ्या प्लेलिस्ट मधलं दुसरं गाणं सुरु झालं.."तुने मारी एन्ट्री और दिलमे बजी घंटी.. " मी जागा झालो. माझ्या स्वप्नातल्या जगातून वास्तविक जगात आलो. सुरु असलेलं गाणं वास्तवात बदललेलं.."तुने मारी एन्ट्री और ट्रेन कि बजी घंटी" बघतोतर काय, कसं, कधी, केव्हा माझ्या हातून ट्रेन ची ती "emergency chain " ओढल्या गेली कळलं सुद्धा नाही.
Very good story yr
ReplyDeleteMst rangawal neha 👍
ReplyDeleteTy apu☺
Delete