Skip to main content

आई

आई 

"मातृदेवं भवं.🙏, 
पितृदेवं भवं🙏, 
गुरुदेवं भवं🙏"

ह्या ओळी तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत.  😇आई हि आपल्या जीवनातली पहिली गुरू ह्या ओळीतही तेच स्पष्ट केलेलं आहे. 
आई हि खरच खूप महान असते, ती तिच्या मुलांवर खूप प्रेम करते. त्यांना सुंदर आणि विशाल जग दाखवते. त्यांना जगायला शिकवते. त्यांना आलेल्या संकटांवर कस मत करायचं ते सांगते. 😄ती आपलं सगळं दुःख विसरून मुलांना आनंदात आणि सुखात ठेवते. ती मुलांनी केलेला प्रत्येक हट्ट पूर्ण करते. 
"अशी हि आई स्वतः समोर दुःखाचं 🏞डोंगर उभ राहून सुद्धा मुलांसाठी सुखाचं सुंदर रान🏞 उभं करते"
एक कवितेतल्या ओळी..😊

"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
आणि खरंच तिन्ही लोकांचा स्वामी हा आईशिवाय भिकारीच आहे. आपल्याकडे कितीही पैसा असला तरी त्याची किंमत आईसमोर शून्य ⭕असते. 
तुला माहित आहे आई मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. तू माझ्या लहानपणीच्या प्रत्येक हट्टाला 😍पुरवलं. कधी पैसे नसताना पण तू मला काही कमी केलेलं नाही.  आई तुझं हृदय💗 खूप कठोर आहे आणि प्रेमळ सुदधा.
 मला आठवते लहानपणापासून मी तुझ्याशी 😔भांडायची, तू मला रागवायची तर खूप राग 😡यायचा. तू नेहमी म्हणायची न , कि तू माझ्यापासून दूर जायला पाहिजे, तेव्हाच तुला कळेल. 
म्हणतात ना, कि आईचे शब्द कधी वाया जात नसतात. घडलं ते गेली न मी आता तुझ्या पासून 😖दूर. पण या दुराव्यामुळे आपल्यातलं प्रेम 💝हे वाढतच चाललेलं आहे. 
तू घरी 🏤नसलीस तर तुझी सारखी आठवण येते. तू थोडीशीही नाही दिसली कि तुला फोन📞 करनं, शेजारी जाऊन बघणं 👀..असला शोध सुरु होतो. 
आई तू सोबत असलीस ना तर मी खूप😍 खुश राहते आणि खूप 😁आनंदही. आई तू सोबत असलीस तर मला कशाचाही कमीपणा जाणवत नाही कारण तू माझी हिंमत 🤘आणि विश्वास आहेस. आई मी तुला माझ्या प्रत्येक गोष्टी सांगत असते. आई मला हे आवडतं, ते आवडत नाही, आज मला कुणीतरी 😊भेटलं, आई मला चांगले गुण मिळाले.. माझ्या पेपर बद्दल, माझ्या कॉलेज 🏬बद्दल, माझ्या मित्र-मैत्रिणीबद्दल. ..
आई तू फक्त आईच नाही तर माझी प्रिय मैत्रीण💛 आणि बहीण सुद्धा आहे.

तुला माहित आहे आई मी जेव्हा शेगावला असते, रात्री झोपल्यानंतर😴 सकाळी उठण्यासाठी माझे कान 👂ऐका आवाजसाठी अतुरलेले असतात. ते म्हणजे तुझ्या जोरात हाक मारण्याचा आवाज. पण शेवटी अलार्म ⏰च्या आवाजाने उठावं लागतं. तुझ्या हाताच्या साध्या जेवणाची 🍛आठवण येते जेव्हा-जेव्हा मला भूक लागते. 
आई मला हे करून दे, ते करून दे,मला ते पाहिजे..असा हट्ट पुरवण्यासाठी तू नसते😞 तिथे ..हे जेव्हा कळतं तेव्हा डोळ्यात पाणी😭 येतं. हे तर वेगळंच, निदान आई म्हणण्यासाठी तिथे आई नसते याचा जेव्हा भास होतो ना, ..तर डोळ्यातून भर भर अश्रू 😭गळतात गं. या ओल्याचिंब झालेल्या पापण्यानां पुसायला सुदधा तू 😦नसते. 
आई तुझं ते शारदेचं शांतीचं रूप 😧आणि महालक्ष्मीचं प्रेमळ रूप 😇मला आठवते. तू जेव्हा चिडते रागावते😠 ते रणारागिनीचं रूप मला आठवते. आणि या सगळ्या गोष्टींना मी खूप miss करते आई. 
पण या सगळ्या गोष्टींना अलीकडे ठेऊन, आपल्याला जीवनात एक ध्येयाचं शिखर गाठायचं आहे हेंच मनात येतं. आणि शेवटी गहिवरून आलेलं हे मन एकच वाक्य बोलून जातो तेही शेवटचं... 
"आई निदान प्रेम करण्यासाठी नाहीतर.....
रागवण्यासाठी तरी ये...ये ना गं आई..."

(Note: If you really love 💝your mother, then please comment.)

Comments

  1. आईची आठवण, म्हणजे जीव्हाळ्याची साठवण....��आई खुश नेहा.. ����

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. Khup Chan Neha.. Aaichi aathvanach karun Dilis tu ..

    ReplyDelete
  5. Neha...Tu Aaila kiti miss krt ahes te kaltay tuzya Blog mdhun......����
    ani १ dm Mastt���� lihil ahes..��..Great Job..����

    Lge reh ... Lge reh...������������

    ReplyDelete
  6. Nice lines ������

    ReplyDelete
  7. Ekdam mstt blog lihila ahe.....😘

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...