अविस्मरणीय दिवस(भाग-२)
शेवटच्या दिवसाची भेट हि पुणेमधील "रामकृष्ण" कंपनीची.🏢कंपनीचं नावं हे देवाचं 🙏नाव,आणि येथील काम करणारी माणसं देखिल धार्मिक विचारांची. म्हणतात ना, "विज्ञानाला अध्यात्माची जोड असावी"
तेथील मॅडम-सरांनी आम्हाला नोकरीबद्दल, कंपाणीबद्दल माहिती दिली, त्यांनी अनुभवलेले अनुभव सांगितले.😇🙂एवढच नाहीतर "खरंतर आपण काय शिकतो, आणि कंपनीमध्ये नेमकं काय घडतं" यातला फरक देखील सांगितला.
त्यामधील एक भारदस्त व्यक्तीमत्त्व🙂, निर्मळ स्वभाव😇,चेहऱ्यावर गोड हास्य असणारे😊, ज्यांच्या गोड वाणीने श्रोत्यांचे मन जिंकून घेणारे वक्ता म्हणजे "योगेश्वर कस्तुरे" सर.
ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय? हे सांगतांना त्यांनी एक साधं उदाहरण दिलं. एक चोर असतो त्याला त्याच्या मुलाला ट्रेनिंग द्यायची असते. हे ट्रेंगिंग देणार तरी कसं?🤔 हा प्रश्न त्या अनुभवी चोराला पडतो. तो त्याच्या मुलाला म्हणतो, "चल 🚶आता ट्रेनिंगला". चोर त्याला राजवाड्यात घेऊन जातो. त्याच्यासाठी हि चोरी म्हणजे "एखाद्या मोठया कंपनीमधील 🏙ट्रेनिंग.." "ट्रेनिंगमध्ये पस झालं तर टिकणार नाहीतर जाणार..". राजवाड्यात🏙 सगळे रात्रीला निवांतं झोपलेले असतांना, हे दोघे हळूच, चाहूल न लागता, नजर 👀चुकवून राजवाड्याच्या खजिन्याजवळ 🗃पोहोचले. सगळं समान पोत्यात भरून झाल्यानंतर, चोर आपल्या मुलाला खाली केलेलं कपाट पुन्हा उघडायला लावतो आणि म्हणतो,"बघ काही राहाल तर नाही ना?". जसा हा डोकावुन कपाटाच्या आत पाहतो 👀तसाच चोर त्याला आतमध्ये ढकलून कापाटाचं दार बाहेरून लावतो. त्या खोलीतील एक भांड जोरात खाली आपटून पळून 🏃जातो. त्या भांड्याच्या आवाजाने राजवाड्यातील सर्वे जागे झाले. चोराच्या मुलासाठी "जीवनातला सर्वात मोठा धोका...आपल्याच बाबाने दिलेला." त्या क्षणी चोराच्या मुलाला त्याचाच बाबांवर खूप राग😠 आला तो मनात म्हणाला, " एकटच पळून जायचा होतं तर शांतपणे जायचं न ,सर्वाना जागे करून कश्याला जायचं". त्याला बाहेरन आवाज 👂आला.."चोरी झाली..चोरी झाली". राज्याच्या आदेशानुसार जिकडेतिकडे शोध सुरु झाला. त्यावेळी चोराच्या मुलाच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार होता,"कापटाच दार उघडताच झपाट्याने🏃 पळायचं". त्यातल्या एकाने कपाटाच दार उघडलं,दार उघडताच चोर एकदम फुर्रर्र..😂 सर्वांना आश्चर्य वाटलं, बाहेरून बंद असणाऱ्या कपाट मधून चोर..चोराचा मुलगा जाम घाबरलेला होता, मागे त्याला पकडण्यासाठी शिपाई लागले होते. त्याला एक समोर विहीर दिसली👁. स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने विहिरीजवळचा एक मोठा दगड ⛄विहिरीत जोरात फेकला. शिपायाला वाटलं चोर विहिरीत कुदला. त्याची सुटका झाली. तो घरी 🏠पोहोचला. जितक्या रागाने त्याने घरचा दार वाजवला तेवढ्याच शांततेने त्याच्या बाबाने दार उघडला. 🚪 तो त्याच्या बाबांवर फार चिडला, 😠रागावला होता. तो शांत झाल्यानंतर त्याने त्याचा मुलाला समजावून सांगितलं,
तो हसत म्हणाला,"तू ट्रेनिंग मध्ये पास झालास, आता तू खरा चोर झाला"😇
या मजेदार उदाहरणातून "ट्रेनिंग हे कधीच पूर्ण होत नसते, ते सतत चालु असते. मग ते ट्रेनिंग मिळतं, किंवा आपण घेतो. जीवनातील प्रत्येक ट्रेनिंग हे वेगळी असते. जो पर्यंत कुठलं ट्रेनिंग मिळत नाही तो पर्यंत कुठलीही गोस्ट आपण स्वतः अनुभवत नाही. प्रत्येकाच ध्येय वेगळं असतं🙂, जीवनशैली वेगळी असते, वेगवेगळ्या इच्छा-अपेक्षा असतात. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी स्वतः ला एक्स्पर्ट बनवा, स्वतः ला एक्सप्लोर करन शिका. 😊 कुठलंही काम करतांना ते "सबमिशन मोड" नाही, तर ते "एक्सप्लोरेशन मोड " मध्ये करा, मग तो अभ्यास जरी असला तरी चालेल. मग जीवनातील कुठलंही ट्रेनिंग तुम्ही सहजतेने पार करू शकाल. 😇😇" हा संदेश त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाला.
या कंपनीला भेट दिल्यानंतर कॉलेजची पाखरं, कॉलेजच्या घरट्यात पुन्हा परत अली🐤🐤.
मनाच्या कोपऱ्यात आठवण म्हणून खोलवर रुजून बसणारे हे पुण्यातील चार दिवस म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय दिवस...
पुन्हा पुणेमधील धुकं पहावी👁, असं वाटतं या डोळ्यांना..
खिडकीतून पुन्हा हळुवार वाऱ्याचा स्पर्श😍 व्हावा, असं वाटतं या मनाला..
वाटतं पुन्हा अनुभवावा, या हिरवागार 💚🍀निसर्गाला....
वाटतं पुन्हा जगावे चार दिवस 👧आठवणींचे....
मित्र-मैत्रिणींच्या 👫सोबतीचे....
अभ्यास📖 सोडून धमाल नि मस्तीचे⛷🏄🏇...
कुठलाही बंधन नसलेल्या मनमोकळेपणाचे🤗...
कॉलेजच्या 🕋बाहेरच्या जगाचे....
हे चार ""अविस्मरणीय दिवस पुण्याचे💗""...
It's really Awesome....aapne to sidha pune me land karwaya,padhte padhte
ReplyDeleteSuperbb neha .....
ReplyDeleteEkdum bhari example
ReplyDeleteTy to all😊😄😄
ReplyDeleteMast..
ReplyDelete👌👌 🔥 🔥
ReplyDeleteTy
ReplyDelete